बालकामगारांची पाऊले व्यसनाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:50 IST2017-11-14T00:50:15+5:302017-11-14T00:50:15+5:30

शासनाकडून मोठा गाजावाजा करीत बालकामगार विरोधात मोहीम सुरु करण्यात येते़, परंतु या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणीच करण्यात येत नसल्यामुळे जिल्हाभरात अनेक धोक्याच्या ठिकाणी चिमुकल्यांना कामास जुंपले जाते़ कमी वयातच मेहनतीची कामे करणारी ही मुले मग व्यसनांच्या आहारी जातात़ डॉक्टरांच्या चिठ्ठीविना सहज मिळणाºया अनेक औषधींचा त्यासाठी वापर करण्यात येतो़ गेल्या काही वर्षांत नशेसाठी वापरण्यात येणाºया या औषधांच्या विक्रीत चार पटींनी वाढ झाली आहे़

The steps of child labor | बालकामगारांची पाऊले व्यसनाकडे

बालकामगारांची पाऊले व्यसनाकडे

शिवराज बिचेवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: शासनाकडून मोठा गाजावाजा करीत बालकामगार विरोधात मोहीम सुरु करण्यात येते़, परंतु या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणीच करण्यात येत नसल्यामुळे जिल्हाभरात अनेक धोक्याच्या ठिकाणी चिमुकल्यांना कामास जुंपले जाते़ कमी वयातच मेहनतीची कामे करणारी ही मुले मग व्यसनांच्या आहारी जातात़ डॉक्टरांच्या चिठ्ठीविना सहज मिळणाºया अनेक औषधींचा त्यासाठी वापर करण्यात येतो़ गेल्या काही वर्षांत नशेसाठी वापरण्यात येणाºया या औषधांच्या विक्रीत चार पटींनी वाढ झाली आहे़
नांदेड शहरात मोठे ५० ते ५५ चहाच्या टपºया आणि छोट्या हॉटेलांची संख्याही पाचशेहून अधिक आहे़ या हॉटेलमध्ये सर्रासपणे कामासाठी बालकामगार ठेवले जातात़ मोठ्या हॉटेलमध्ये ग्राहकांना सेवा पुरविण्यासाठी वेटर ही संकल्पना असली तरी, स्वयंपाकगृह व इतर कामांसाठी बालकामगारांचा वापर केला जातो़ त्याचबरोबर पंक्चरचे दुकान, गॅरेज, वीटभट्टी, बांधकाम, ब्रेडचे कारखाने, स्वीटमार्ट यासह अनेक ठिकाणी बालकामगार सर्रास आढळून येतात़
काही हॉटेलचालकांनी मात्र ‘येथे बालकामगार ठेवले जात नाही’ असे फलकही डकविले आहेत़ दरम्यान, हे बालकामगार मेहनतीची कामे करताना दुसरीकडे व्यसनांच्या आहारी जात असल्याचेही आढळून आले आहे़ सध्या बाजारात त्यांना नशापाणी करण्यासाठी सहजपणे औषधी उपलब्ध होतात़ त्यामध्ये झेंडू बाम, व्हाईटनर, थिनर, आयोडेक्स, डास मारण्याचे लिक्वीड, खोकल्यांची औषधी, सायप्रोहिपडीन आणि डेग्जामिटर स्टोन, व्हायग्रा, सुहाग्रा याचा सर्रासपणे वापर करण्यात येत आहे़, असे वैद्यकीय वर्तुळातील सुत्रांनी सांगितले. ही सर्व औषधी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळतात. त्यामुळे बालकामगारांचा याकडे अधिक ओढा आहे़

Web Title: The steps of child labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.