स्टेपनी अंगावर पडून बालक ठार
By Admin | Updated: June 3, 2014 00:46 IST2014-06-03T00:27:16+5:302014-06-03T00:46:43+5:30
भूम : भरधाव वेगातील बसची निघालेली स्टेपनी अंगावर पडल्याने शेतात झोपलेल्या तीन वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला़

स्टेपनी अंगावर पडून बालक ठार
भूम : भरधाव वेगातील बसची निघालेली स्टेपनी अंगावर पडल्याने शेतात झोपलेल्या तीन वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला़ ही दुर्दैवी घटना सोमवारी दुपारच्या सुमारास शहरानजीक भूम- सरमकुंडी मार्गावरील शेतात घडली़ पोलिसांनी सांगितले की, सरमकुंडी फाट्यावरून भूम शहराकडे जाणार्या एका लाल बसची शहरानजीक एक ते दीड कि़मी़अंतरावरील शेताजवळ स्टेपनी निघून पडली़ निघालेली ही स्टेपनी शेतात झोपलेल्या यश दत्ता हुरकुडे (वय ३) याच्या अंगावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला़ त्यावेळी त्याची आई त्याच्या शेजारी बसली होती़ तर इतर लोक शेतात काम करीत होते़ घटनेनंतर निघून पडलेल्या स्टेफनीकडे दुर्लक्ष करीत बससह चालक फरार झाला़ या प्रकरणी दिगंबर उत्तम हुरकुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बसचालकाविरूध्द भूम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोहेकॉ धोत्रीकर हे करीत आहेत़ (वार्ताहर)