दुर्गंधीमुक्तीसाठी पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:54 IST2017-08-06T00:54:01+5:302017-08-06T00:54:01+5:30
घाटी रुग्णालयास अस्वच्छतामुक्त करण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे.

दुर्गंधीमुक्तीसाठी पाऊल
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : घाटी रुग्णालयास अस्वच्छतामुक्त करण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. चतुर्थश्रेणी कर्मचाºयांची भरती होईपर्यंत साफसफाईच्या कामासाठी शासकीय कर्करोग रुग्णालयातील रोजंदारी कर्मचाºयांची मदत घेण्यात येणार आहे. घनकचºयाच्या विल्हेवाटीसाठी महापालिकेकडे हुक कंटेनरची मागणी करण्यात आली आहे.
शासकीय कर्करोग रुग्णालयात कार्यरत ५० रोजंदारी कर्मचारी ‘घाटी’च्या अंतर्गत येतात. घाटीतील स्वच्छतेच्या कामासाठी यातील काही कर्मचारी नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे घाटीतील स्वच्छतेचा प्रश्न निकाली लागेल, अशी अपेक्षा आहे.
लोकमतमधून प्रसिद्ध होणाºया वृत्तमालिकेनंतर घाटीत जागोजागी पडलेले घनकचºयाचे ढीग उचलण्यात येत आहेत. वसतिगृहाच्या स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्यात येत आहे. मूत्रपिंड विकार व मूत्रपिंडरोपण विभागाच्या बाजूला कचरा जमा केला जातो.
येथे कचरा जमा करण्यासाठी हुक कंटेनर देण्याची मागणी मनपाकडे करण्यात आली आहे. कचरा वर्गीकरणासाठी पाठपुरावा करण्याची तयारी प्रशासनाने केली. (समाप्त)