अपघात टाळण्यासाठी ‘एसटीचा’नवीन उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:28 IST2017-09-22T00:28:45+5:302017-09-22T00:28:45+5:30
एसटी वाहक -चालकांच्या आरोग्य दृष्टीने व अपघात टाळण्यासाठी आता महाराष्टÑ राज्यमार्ग परिवहन महामंडळाने नवीन उपक्रम हाती घेतला आहे. रात्रवस्तीसाठी (मुक्कामी) ग्रामीण भागात जाणाºया वाहक-चालकांना सोयी-सुविधां पुरविण्याच्या सूचना महाव्यवस्थापकांनी विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत.

अपघात टाळण्यासाठी ‘एसटीचा’नवीन उपक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : एसटी वाहक -चालकांच्या आरोग्य दृष्टीने व अपघात टाळण्यासाठी आता महाराष्टÑ राज्यमार्ग परिवहन महामंडळाने नवीन उपक्रम हाती घेतला आहे. रात्रवस्तीसाठी (मुक्कामी) ग्रामीण भागात जाणाºया वाहक-चालकांना सोयी-सुविधां पुरविण्याच्या सूचना महाव्यवस्थापकांनी विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत.
ग्रामीण भागात रात्रवस्तीसाठी जाणाºया बस चालक - वाहकांच्या राहण्याची पिण्याच्या पाण्याची, स्वच्छता गृहाची सुविधा नाही. तशा तक्रारीही मध्यवर्ती कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. सदर सोयीसुविधा बºयाच ठिकाणी उपलब्ध नसल्याने चालक-वाहकांना पुरेशा आराम मिळत नाही. परिणामी अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. या बाबी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्यवर्ती कार्यालय मुंबईचे महाव्यवस्थापक(वाहतूक) यांनी विभाग नियंत्रक रा. प. औरंगाबाद ,बीड, जालणा, लातुर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, ठाणे,भंडारा,चंद्रपूर नागपूर, वर्धा, गडचिरोली, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, धुळे, नाशिक, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ यांना परिपत्रकानुसार सुचना दिल्या आहेत. परिपत्रकात म्हटले की, विभागातील आगार व्यवस्थापकांनी रात्रवस्तीसाठी बसेस जात असलेल्या संबंधित गावांना भेटी द्याव्यात. तसेच गावातील सरपंच यांच्याशी पत्रव्यवहार करून व विभाग नियंत्रकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांशी पत्रव्यवहार करावा. शिवाय समक्ष भेटी घेऊन रात्रवस्तीसाठी जाणाºया बसेसच्या चालक वाहकांना राहण्यासाठी तसेच त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची, व स्वच्छतागृहाची आदी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल आहेत. शिवाय याबाबत केलेल्या कार्यवाहिची माहिती मध्यवर्ती कार्यालयास सादर करण्याचेही सांगण्यात आले आहे.