राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा बसविणार

By Admin | Updated: August 28, 2014 00:00 IST2014-08-27T23:58:40+5:302014-08-28T00:00:47+5:30

नांदेड: राजर्षी शाहू महाराज यांचा पुर्णाकृती १२ फुटी पुतळा जंगमवाडी मधील पावडेवाडी नाका येथील २ हजार ८१४ चौ़ मी़ जागेत बसविण्यात येणार आहे़

The statue of Rajarshi Shahu Maharaj will be installed | राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा बसविणार

राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा बसविणार

नांदेड: राजर्षी शाहू महाराज यांचा पुर्णाकृती १२ फुटी पुतळा जंगमवाडी मधील पावडेवाडी नाका येथील २ हजार ८१४ चौ़ मी़ जागेत बसविण्यात येणार आहे़ या ठिकाणी होणाऱ्या सुशोभिकरणामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे़
शहरात महात्मा फुले, महात्मा बसवेश्वर, राजर्षी शाहू महाराज, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे पुतळे बसविण्यात येणार आहेत़ त्यानुसार राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेची निश्चिती झाली आहे़ वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, परभणी यांची जागा महापालिकेस हस्तांतरण करण्यात आली आहे़ ही जागा मनपाने ताब्यात घेतली आहे़ या ठिकाणी राजर्षी शाहू महाराज यांचा ब्राँझ धातूमध्ये १२ फुटी पुर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे़ या परिसरात सुशोभिकरण करण्यासाठी फोरट्रेस कंपनीकडून आराखडा तयार करण्यात आला आहे़ पुतळ्याचे काम प्रगतीपथावर असून लवकरच अनावरण होणार आहे़ त्यानंतर पावडेवाडी नाका परिसरात उद्यान उपलब्ध होणार आहे़
राजर्षी शाहू महाराज यांच्या नियोजित पुर्णाकृती पुतळ्याच्या जागेचा प्रारंभ मंगळवारी पालकमंत्री डी़ पी़ सावंत यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी महापौर अब्दुल सत्तार, उपमहापौर आनंद चव्हाण, आयुक्त डॉ़ निशिकांत देशपांडे, उपायुक्त रत्नाकर वाघमारे, विरेंद्रसिंघ गाडीवाले यांची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)

Web Title: The statue of Rajarshi Shahu Maharaj will be installed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.