स्टेशन मास्तर,पॉइंटस्मनला कारावास
By Admin | Updated: May 22, 2016 00:39 IST2016-05-22T00:23:58+5:302016-05-22T00:39:02+5:30
औरंगाबाद : सिकंदराबाद-मनमाड एक्स्प्रेसचा मालगाडीसोबत २००३ साली अपघात होऊन ७४ लोक गंभीर जखमी झाले होते, तर २० लोक मरण पावले होते.

स्टेशन मास्तर,पॉइंटस्मनला कारावास
औरंगाबाद : सिकंदराबाद-मनमाड एक्स्प्रेसचा मालगाडीसोबत २००३ साली अपघात होऊन ७४ लोक गंभीर जखमी झाले होते, तर २० लोक मरण पावले होते. या प्रवाशांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून घाटनांदूर रेल्वेस्टेशनचे तत्कालीन स्टेशन मास्तर प्रशांतकुमार वर्मा याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (रेल्वे) ए.सी. डोईफोडे यांनी चार वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि ५० हजार रुपये दंड ठोठावला. तसेच तत्कालीन पॉइंटस्मन विनायक नागरगोजे याला दोव वर्षे कारावासाची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला.
परळीच्या रेल्वे पोलिसांनी सदर अपघाताचा तपास करून स्टेशन मास्तर आणि पॉइंटस्मनविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे १३ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. तसेच घाटनांदूर रेल्वेस्टेशनवरील सिग्नल पद्धतीबाबत विविध कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली. सुनावणीअंती न्यायालयाने स्टेशन मास्तर आणि पॉइंटस्मन यांना दोषी धरले. त्यांनी सिग्नलचे योग्य पॉइंट लावले नाही तसेच चुकीचे सिग्नल दिले. त्यांच्या या चुकांमुळे अपघात (पान २ वर)