स्थानकप्रमुख महिलेचे दागिने केले लंपास

By Admin | Updated: November 12, 2014 00:25 IST2014-11-12T00:22:00+5:302014-11-12T00:25:24+5:30

ेउमरगा : बस थांब्यावरून बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या गळ्यातील २ लाख २७ हजार ५०० रूपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले़ ही घटना सोमवारी

Station house women's jewelery lamps | स्थानकप्रमुख महिलेचे दागिने केले लंपास

स्थानकप्रमुख महिलेचे दागिने केले लंपास


ेउमरगा : बस थांब्यावरून बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या गळ्यातील २ लाख २७ हजार ५०० रूपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले़ ही घटना सोमवारी डिग्गी नजीकच्या उमरगा- लातूर बस थांब्यावर घडली़ दरम्यान, सदरील महिला ही माजलगाव स्थानकाच्या प्रमुख असल्याचे पोलिसांनी सांगितले़
पोलिसांनी सांगितले की, उमरगा तालुक्यातील डिग्गी येथील वैशाली सुधीर कुलकर्णी या माजलगाव बसस्थानकाच्या स्थानकप्रमुख म्हणून कार्यरत आहेत़ त्या काही दिवसांपूर्वी माहेरी डिग्गी येथे आल्या होत्या़ डिग्गी येथून परत माजलगावकडे जाण्यासाठी सोमवारी दुपारी त्या उमरगा-लातूर बस थांब्यावर आल्या होत्या़ लातूरकडे निघालेल्या बसमध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यातील चार तोळ्यांचे गंठण, साडेतीन तोळे सोन्याचे पोहहार, सव्वा तोळ्याचे नेकलेस असा २ लाख २७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला़ या प्रकरणी वैशाली कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोउपनि विजय गायकवाड हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: Station house women's jewelery lamps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.