राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेत अधीक्षक आरती सिंह यांना गोल्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:55 IST2018-01-12T00:54:57+5:302018-01-12T00:55:24+5:30
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाºया औरंगाबाद ग्रामीण विभागाच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी मुंबई येथील राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन गुरुवारी गोल्डन कामगिरी केली. यामुळे क्रीडा क्षेत्रातही ‘हम भी कुछ कम नहीं’ हे त्यांनी सिद्ध केले.

राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेत अधीक्षक आरती सिंह यांना गोल्ड
औरंगाबाद : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाºया औरंगाबाद ग्रामीण विभागाच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी मुंबई येथील राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन गुरुवारी गोल्डन कामगिरी केली. यामुळे क्रीडा क्षेत्रातही ‘हम भी कुछ कम नहीं’ हे त्यांनी सिद्ध केले.
याआधी कधीही अॅथलेटिक्समध्ये सहभागी झालेले नसतानाही त्यांनी या स्पर्धेत ५ कि.मी. वॉकिंगमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यांनी हे अंतर ३२ मिनिटे आणि ५ सेकंदांत पूर्ण केले. एआयजी स्पेशल आॅपरेशनच्या शीला एस. यांनी रौप्यपदक जिंकले. दौंड येथील मनीषा दुबिले यांनी कास्यपदक जिंकले.
विशेष म्हणजे आरती सिंह यांनी पुरुष आणि महिलांच्या एकत्रित ५ कि. मी. चालण्याच्या स्पर्धेतही रौप्यपदकाची कमाई केली. यात कृष्णा प्रकाश यांनी सुवर्णपदक जिंकले. आरती सिंह यांनी याआधी नेमबाजीतही विशेष ठसा उमटवला होता. त्यांनी २०१२ मध्ये नागपूर येथे झालेल्या पोलीस क्रीडा स्पर्धेत नेमबाजीतही सुवर्णपदक जिंकण्याची किमया साधली होती.