मी वडार महाराष्ट्राचातर्फे राज्यस्तरीय महिला मेळावा

By Admin | Updated: May 20, 2014 00:06 IST2014-05-19T23:58:40+5:302014-05-20T00:06:44+5:30

परभणी : मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या वतीने राज्यात प्रथमच पुणे येथे २५ मे रोजी राज्यस्तरीय वडार महिला मेळावा आयोजित केला आहे.

State-level women's fair organized by I Maharashtra Maharashtra | मी वडार महाराष्ट्राचातर्फे राज्यस्तरीय महिला मेळावा

मी वडार महाराष्ट्राचातर्फे राज्यस्तरीय महिला मेळावा

परभणी : मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या वतीने राज्यात प्रथमच पुणे येथे २५ मे रोजी राज्यस्तरीय वडार महिला मेळावा आयोजित केला आहे. विजय चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा होत आहे. या मेळाव्यात महिलांना उद्भवणार्‍या सामाजिक समस्या, त्याचप्रमाणे राजकीय व निमशासकीय क्षेत्रात महिलांचे स्थान, महिलांना शासनाने प्रदान केलेल्या अधिकाराची जाणीव करुन देणे, संविधानानुसार महिलांना प्रदान केलेल्या अधिकारानुसार त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी चर्चा होणार आहे. महिला प्रदेशाध्यक्षा करुणाताई रणसुरे व कार्याध्यक्षा ज्योतीताई शिंदे यांनी मेळाव्याचे आयोजन केले आहे. परभणी जिल्ह्यातून जास्तीत जास्त महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन महिला जिल्हाध्यक्षा तारामती गुजर, शांताबाई शिराळे, मीराताई गुजर, संगीताताई गुजर, रुख्मिणबाई डुकरे, जिल्हा संपर्कप्रमुख मनोहर शिंदे, जिल्हाध्यक्ष संतोष गुजर, ेजिल्हा संघटक नामदेव डुकरे, तुकाराम पवार, लालू जाधव आदींनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: State-level women's fair organized by I Maharashtra Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.