परभणीत गुदरोगावर राज्यस्तरीय परिसंवाद
By Admin | Updated: July 16, 2014 00:46 IST2014-07-16T00:14:57+5:302014-07-16T00:46:48+5:30
परभणी: आयुर्वेद व्यासपीठ परभणीच्या वतीने २० जुलै रोजी राज्यस्तरीय गुदरोग परिसंवाद आयोजित केला आहे.

परभणीत गुदरोगावर राज्यस्तरीय परिसंवाद
परभणी: आयुर्वेद व्यासपीठ परभणीच्या वतीने २० जुलै रोजी राज्यस्तरीय गुदरोग परिसंवाद आयोजित केला आहे.
१३ जुलै रोजी श्री मंगल कार्यालयात होणाऱ्या या परिसंवादामध्ये डॉ. महेश संघवी (मुंबई), डॉ. विजय उखळकर (नांदेड), डॉ. प्रसाद वैद्य (औरंगाबाद), डॉ. सूर्यकिरण वाघ (कोल्हापूर), डॉ. राजेश गुप्ता (सावंतवाडी) हे मार्गदर्शन करणार आहेत.
गुदविकार (मुळव्याध, भगंदर, फिशर) हे सर्वसामान्यांच्या आयुष्यातील यक्ष प्रश्न बनले आहेत. खान्या-पिण्यातील चुकीच्या सवयी, बैठे व्यवसाय, अति जागरण, ताण-तणाव आदी कारणांमुळे गुदविकार रुग्णांची संख्या वाढली आहे. आयुर्वेदिय आणि आधुनिक शास्त्रांची सांगड घालून डॉक्टरांमध्ये या विषयाचे सखोल ज्ञान वाढविणे, या क्षेत्रात नवीन डॉक्टरांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने हा परिसंवाद आयोजित केला आहे. राज्यभरातील जास्तीत जास्त डॉक्टरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष डॉ. जयश्री कालानी, सचिव डॉ. कुणाल कौसडीकर, डॉ.रवी भंडारी, डॉ. आनंद उंडेगावकर, डॉ. धीरज देशपांडे, डॉ. सचिन मुंदडा, डॉ. पूजा बाहेती, डॉ. प्रवीण नगराळे आदींनी केले आहे. (प्रतिनिधी)