राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:17 IST2017-12-31T00:17:33+5:302017-12-31T00:17:51+5:30

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबाद शहरात राज्यस्तरीय भव्य टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

State-level Cricket Tournament | राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबाद शहरात राज्यस्तरीय भव्य टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा एडीसीएच्या एन-२ स्टेडियमवर होणार आहे. या स्पर्धेसाठी १६ संघांना निमंत्रित करण्यात येणार आहे. त्यात एअर इंडिया, वेस्टर्न रेल्वे, डेक्कन जिमखाना, जैन इरिगेशन असे संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेनिमित्त झालेल्या बैठकीत शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे टी-२० क्रिकेट चषकाचे अनावरण करून उपस्थितींना मार्गदर्शन केले. महापौर नंदकुमार घोडेले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

Web Title: State-level Cricket Tournament