राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:34 IST2017-10-27T00:31:35+5:302017-10-27T00:34:23+5:30

जिल्हा क्रीडा परिषद परभणी आणि जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शालेय बुद्धीबळ स्पर्धेचे उद्घाटन २६ आॅक्टोबर रोजी खा. बंडू जाधव आणि जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या हस्ते झाले.

State Level Chess Inauguration | राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेचे उद्घाटन

राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा क्रीडा परिषद परभणी आणि जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शालेय बुद्धीबळ स्पर्धेचे उद्घाटन २६ आॅक्टोबर रोजी खा. बंडू जाधव आणि जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या हस्ते झाले.
येथील जिल्हा बॅडमिंटन हॉलमध्ये ही स्पर्धा होत आहे. उद्घाटन कार्यक्रमास शिवछत्रपती पुरस्कार विजेते जयंत गोखले, अखिल महाराष्ट्र बुद्धीबळ संघटनेचे कार्याध्यक्ष विजय देशपांडे, परभणी जिल्हा बुद्धीबळ संघटनेचे अध्यक्ष दिलीप राखे, रविंद्र पंडित, संभाजी बिल्पे, चंद्रशेखर पोटेकर, वैभव जैन, अनिल सेलगावकर, संजय निकम, विनिता श्रोत्री, नरेंद्र पाटील, जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रशेखर साखरे यांची उपस्थिती होती. तनुजा कापरे यांनी सूत्रसंचालन केले. सुधीर चपळगावकर यांनी आभार मानले. या स्पर्धेसाठी राज्यभरातून ३०० हून अधिक स्पर्धक दाखल झाले आहेत.

Web Title: State Level Chess Inauguration