शेतकऱ्यांचे राज्य आले पाहिजे

By Admin | Updated: September 12, 2014 00:08 IST2014-09-11T23:40:32+5:302014-09-12T00:08:09+5:30

परभणी: महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत सातव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत.

The state of the farmers should come | शेतकऱ्यांचे राज्य आले पाहिजे

शेतकऱ्यांचे राज्य आले पाहिजे

परभणी: महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत सातव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात शेतकरी आत्महत्या करीत नव्हते. कारण त्यांना माहीत होते की, माझा राजा माझ्या पाठीशी आहे. पण आता शेतकऱ्यांना माहीत झालंय की, त्यांच्या पाठीशी कोणीही नाही. त्यासाठी शेतकऱ्यांचे राज्य आले पाहिजे, असे प्रतिपादन महानाट्य लेखक प्रा.नितीन बानगुडे यांनी केले.
परभणी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचा मेळावा ११ सप्टेंबर रोजी कृष्णा गार्डन मंगल कार्यालयात पार पडला.
व्यासपीठावर खा. संजय जाधव, आयोजक तथा जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, युवासेना संपर्कप्रमुख डॉ. राहुल पाटील, जिल्हाप्रमुख डॉ. संजय कच्छवे, उपजिल्हाप्रमुख अजित वरपूडकर, माणिक पोंढे, दशरथ भोसले, सखुबाई लटपटे, नंदू अवचार, काशिनाथ काळबांडे, रवींद्र धर्मे, अमित गिते, आर्जून सामाले, ज्ञाानेश्वर पवार, सुधाकर खराटे, संदीप भंडारी, राजूृ कापसे, बालासाहेब जाधव, अनिल डहाळे, अंजली पवार, कुसूम पिल्लेवार, कमलबाई कासले, सुनिता घाडगे, सदाशिव देशमुख आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक गंगाप्रसाद आणेराव यांनी केले. शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब राके यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. बानगुडे म्हणाले, ३५० वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण केले.
सामर्थ्य शक्तीत याचा वापर देशासाठी करायचा आहे, याची जाणीव शिवाजी महाराजांना झाली होती. परंतु, त्यानंतर शिवाजी महाराज विस्मरणात गेल्यानेच इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले. पुन्हा संयुक्त महाराष्ट्रानंतर एका माणसाला कळाले की, शिवाजी महाराजांचे विस्मरण होता कामा नये, म्हणून त्या माणसाने शिवसेना नावाची संघटना काढली. सन्मानाने जगायला शिकविले. त्या माणसाचे नाव म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, असे म्हणताच शिवसैनिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. यावेळी बानगुडे यांनी आघाडी सरकारच्या कारभारावर टीका केली.
खा. संजय जाधव यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मेळाव्यास दगडू काळदाते, गोपीनाथ झाडे, मारोती बनसोडे, देवेंद्र देशमुख, महेश चौधरी, सचिन पाटील, अनिल डहाळे, नवनीत पाचपोर, उदय देशमुख, गोविंद पारटकर, शेख कलीम, गजानन देशमुख, भास्कर देवडे, विलास अवकाळे, प्रमोद गायकवाड, बबन धरणे, रामप्रसाद रणेर आदींसह शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The state of the farmers should come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.