शहरात स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूट

By Admin | Updated: June 27, 2016 01:07 IST2016-06-27T00:42:58+5:302016-06-27T01:07:10+5:30

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूट सुरू करण्यासंदर्भात केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावामुळे विभागीय शासकीय कॅन्सर हॉस्पिटलला

State Cancer Institute in the city | शहरात स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूट

शहरात स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूट


औरंगाबाद : औरंगाबाद शहरात स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूट सुरू करण्यासंदर्भात केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावामुळे विभागीय शासकीय कॅन्सर हॉस्पिटलला स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूटचा दर्जा मिळणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील कॅ न्सर रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबईमध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी माहिती दिली. गेल्या काही वर्षांत कॅन्सर रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरात २१ सप्टेंबर २०१२ रोजी विभागीय शासकीय कॅन्सर हॉस्पिटल रुग्णसेवेत दाखल झाले. कॅन्सर रुग्णांसाठी शासनस्तरावर केवळ मुंबईमध्ये रुग्णालय होते; परंतु औरंगाबादेत कॅन्सर हॉस्पिटल सुरू झाले आणि रुग्णांसाठी ते आता आशेचा किरण ठरत आहे. प्रस्तावित कॅन्सर इन्स्टिट्यूटमुळे कॅन्सर रुग्णांच्या उपचारासाठी आणखी सुविधा वाढतील.
स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूटसंदर्भात प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

Web Title: State Cancer Institute in the city