बहुप्रतीक्षित रस्त्याच्या कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:06 IST2017-07-19T00:02:18+5:302017-07-19T00:06:44+5:30
परभणी : जिल्हा स्टेडियम समोरील बहुप्रतीक्षित रस्त्याच्या कामाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांच्या हस्ते नारळ फोडून सुरुवात करण्यात आली़

बहुप्रतीक्षित रस्त्याच्या कामाला सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील जिल्हा स्टेडियम समोरील बहुप्रतीक्षित रस्त्याच्या कामाला अखेर मंगळवारी मुहूर्त लागला़ माजी मंत्री तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांच्या हस्ते नारळ फोडून प्रत्यक्ष जेसीबी मशीनच्या सहाय्याने कामाला सुरुवात करण्यात आली़
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते शाही मशिदपर्यंचा रस्ता दीड वर्षांपासून उखडला होता़ त्यामुळे वाहनधारक त्रस्त होते़ मंगळवारी माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांच्या हस्ते नारळ फोडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली़ यावेळी उपमहापौर सय्यद समी उर्फ माजू लाला, चाँद लाला, अशोक जेठवाणी, सुधीर पाटील, ‘लोकमत’चे जिल्हा प्रतिनिधी अभिमन्यू कांबळे, अजीज भाई, देवा महामुनी आदींची उपस्थिती होती़
दुसऱ्यांदा बदलला आराखडा
या रस्त्यावरील कमीत कमी झाडे तोडली जातील, या उद्देशाने मनपाने दोन वेळा रस्त्याचा आराखडा तयार केला. काही झाडे रस्त्याच्या कडेला आली तर तेथेच सुशोभीकरण करून रस्त्याचे काम पुढे नेले जाणार आहे़ असे प्रशासनाने सांगितले.