आजपासून सखी मंच सदस्य नोंदणीस प्रारंभ
By Admin | Updated: February 15, 2015 00:46 IST2015-02-15T00:46:47+5:302015-02-15T00:46:47+5:30
जालना : बहुप्रतिक्षीत लोकमत सखी मंचच्या सदस्य नोंदणीस रविवारपासून प्रारंभ होत आहे. रविवारी सकाळी भोकरदन नाक्यावरील गिता कॉम्प्लेक्स येथे

आजपासून सखी मंच सदस्य नोंदणीस प्रारंभ
जालना : बहुप्रतिक्षीत लोकमत सखी मंचच्या सदस्य नोंदणीस रविवारपासून प्रारंभ होत आहे.
रविवारी सकाळी भोकरदन नाक्यावरील गिता कॉम्प्लेक्स येथे सकाळी १० वाजता पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांच्या हस्ते नोंदणीस प्रारंभ होणार आहे. लोकमत सखी मंच महिलांसाठी आनंद व मनोरंजनाचे व्यासपीठ असून यातून महिलांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला जातो. सदस्य नोंदणी शुल्क ३५० रुपये असून यामध्ये ५०० रुपयांचा कढई सेट, सुवर्ण स्पर्श यांच्याकडून ११०० रुपयांच्या दोन बांगड्या तसेच १२३४ रुपयांच्या हमखास भेटवस्तूंचा समावेश आहे. याशिवाय भाग्यवंत विजेत्यांना ३७५०० रुपयांचा लकी ड्रॉ जिंकण्याची संधी असून मोफत डाएट बुक आणि सखी मंच ओळखपत्र मिळणार आहे. त्यासाठी कुठल्याही पुराव्याची किंवा फोटोची गरज नाही. जास्तीत जास्त संख्येने सदस्य नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक सदस्यांनी ९२७१७१३२०२ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)