रविवारपासून सखीमंच सदस्य नोंदणीस प्रारंभ
By Admin | Updated: February 13, 2015 00:50 IST2015-02-12T00:44:45+5:302015-02-13T00:50:18+5:30
जालना : सखीमंच २०१५ ची सदस्य नोंदणी येत्या १५ फेब्रुवारी (रविवार) पासून शहरातील विविध केंद्रांवर सुरु होणार असून नोंदणीसाठी सकाळी ११ ते सायं. ६ वाजेपर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली आहे.

रविवारपासून सखीमंच सदस्य नोंदणीस प्रारंभ
जालना : सखीमंच २०१५ ची सदस्य नोंदणी येत्या १५ फेब्रुवारी (रविवार) पासून शहरातील विविध केंद्रांवर सुरु होणार असून नोंदणीसाठी सकाळी ११ ते सायं. ६ वाजेपर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली आहे.
यावर्षी खास सखींच्या आग्रहास्तव नोंदणी शुल्कात कुठल्याही प्रकारची वाढ न करता मागील वर्षाप्रमाणेच यावर्षी सुध्दा फक्त ३५० रुपये नोंदणी शुल्क ठेवण्यात आले आहे. नोंदणी केल्यानंतर हमखास भेटवस्तुसह ईतर अनेक भेटवस्तू सदस्यांना मिळतील. त्यात ५०० रुपयांचा बहुउपयोगी कढईसेट, १२३४ रुपयांच्या हमखास भेटवस्तू आणि सुवर्णस्पर्श औरंगाबादतर्फे ११०० रुपयांच्या दोन बांगड्याचे कुपन दिले जाईल. या व्यतिरिक्त लक्की ड्रॉद्वारे आपले भविष्य आजमावून खालीलप्रमाणे बक्षीसेही जिंकू शकता येतील. त्यात सुभाषचंद्र घोडेगाववाला यांच्याकडून १५ साड्या, भरत ज्वेलस्तर्फे सोन्याचे १५ नाणे याचा समावेश आहे. यासोबत सखींच्या वाढदिवसानिमित्त प्रियदर्शनी नागरी सहकारी बॅँकेतर्फे एटीएमसह मोफत खाते उघडून मिळणार असून चार्मिस ब्युटीपार्लरतर्फे अॅडव्हान्स हेअरकट, श्री पॅथॉलॉजीच्यावतीने एचबीएसएजी व हॅपेथायथीज बी ची मोफत तपासणी करण्यात येईल.
गुरु मेहंदी यांच्यातर्फे मेहंदीचे दोन कोन मिळतील. जिंदल कॉम्प्लेक्सस्थित जया कॉस्मेटीक यांच्यातर्फे केसांना लावण्याची मेहंदी दिली जाणार आहे.
गणपती मेहंदीकडून एक हर्बल मेहंदी पावडर, आकांक्षा नेत्रालयात मोफत डोळ्यांची तपासणी, खुशबू प्रोडक्ट यांच्याकडून इन्स्टंट पाणीपुरी मसाला पॉकेट, ऋषी फोटो स्टुडिओकडून ४ बाय ६ आकाराचा फोटो, डिस्काऊंट कुपनमध्ये तुलीप ब्युटीपार्लर, अक्षदा मॉडलिंग फोटो स्टुडिओ, मयूर प्लास्टीक होमवेअर प्रोडक्ट, क्रॉकरी क्रिएशन्स, सरिता ब्रिलीयंट अॅकेडमी, राज मिलन मिठाई, गौरी इंटरप्रायजेस, दर्शन रेडीमेड आणि येरावार आॅप्टिकल्स यांच्यावतीने विविध वस्तूंच्या खरेदीवर भव्य डिस्काऊंट कुपन मिळणार आहे. (प्रतिनिधी)
लोकमतची मी नियमीत वाचक तर आहेच. धकाधकीच्या तणावपूर्ण आयुष्यात लोकमत सखी मंचच्या विविध कार्यक्रमाद्वारे रिलीफ मिळते. तसेच या व्यासपीठाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धामध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. त्यामुळे महिलांच्या कला-गुणांना वाव मिळतो. मी तर सखीमंच सदस्य होतच आहे.
- ज्योतिप्रिया सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक,जालना
विचारांची देवाण-घेवाण
लोकमत सखी मंच म्हणजे महिलांना एकत्र करणारे व्यासपीठ असून त्याद्वारे महिलांना विचारांची देवाण-घेवाण करणे सोयीस्कर ठरते. या विचारांच्या अदान-प्रदानामुळे नविन काही शिकण्यास वाव मिळतो. त्यासोबतच मनोरंजनही होते.
-स्मिता गादिया (जैन),
भारत ज्वेलर्स, जालना
एक हक्काचे व्यासपीठ
लोकमत सखी मंचचे अनेक दर्जेदार होतात. नविन वर्षात सुध्दा विविध स्पर्धा व मनोरंजनात्मक कार्यक्रम होतील, अशी खात्री वाटते. या कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी सर्व महिलांनी सखी मंचची सदस्य होणे गरजेचे आहे. हा मंच महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ आहे.
- निर्मला साबू ,
सामाजिक कार्यकर्त्या,जालना
लोकमत सखी मंचच्या वतीने घेण्यात येणाऱ्या अनेक कार्यक्रमांमधून सहभागी होवून आत्मविश्वास वाढतो. यात स्त्रियांचे आरोग्य, सौंदर्य, व्यक्तिमत्व, शिक्षण यासारख्या पैलूंवर विचारमंथन घडून येते. त्यामुळे हा उपक्रम दिवसेंदिवस लोकप्रिय ठरु लागला आहे.
- प्रिया ओसवाल,
प्रियदर्शनी ना.सह.बॅँक,जालना
सकाळी ११ वाजता श्रीकृष्ण मंदिर, वृंदावन कॉलनी, चाणक्य कॉम्प्लेक्सच्या जवळ, जालना
४दुपारी २ वाजता तुळजा भवानी मंदिर, राजमहेल टॉकीज जवळ, नविन जालना.
४सायंकाळी ४ वाजता ख्रिश्चन कॉलनी, जेईएस कॉलेजच्या पाठीमागे, पाण्याच्या टाकीजवळ, नविनजालना.
सखी मंच या नविन वर्षाची पर्वणी म्हणून जालन्यामध्ये पहिल्यांदाच घेऊन येत आहे, ‘मिनीस्टर नव्हे होम मिनीस्टर’ या गंमतीदार खेळात सहभागी व्हायची सुवर्ण संधी.....
४हा ‘मिनीस्टर नव्हे होम मिनीस्टर’ हा कार्यक्रम आपल्या भागात सादर करण्यासाठी इच्छुक असलेल्या सोसायटी, कॉलनीतील व्यक्तिनी आम्हास आपल्या भागात बोलविण्यासाठी ९२७१७१३२०२, ९९२२००४४०७ या क्रमांकावर फोन करुन किमान १०० ते १५० महिला एकत्र आल्यास हा कार्यक्रम आपल्या भागात सादर होवू शकतो. तेव्हा त्वरा करा. लवकरात लवकर आम्हाला फोन करा. व या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. सोबत बक्षीसेही जिंका.