किल्लारी परिसरात पंचनामे सुरू
By Admin | Updated: April 14, 2015 00:42 IST2015-04-14T00:42:26+5:302015-04-14T00:42:26+5:30
किल्लारी : किल्लारी परिसरात द्राक्षबागा, आंबे, केळीबागांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सोमवारपासून सुरू झाले आहे.

किल्लारी परिसरात पंचनामे सुरू
किल्लारी : किल्लारी परिसरात द्राक्षबागा, आंबे, केळीबागांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सोमवारपासून सुरू झाले आहे.
तहसीलदार दत्ता भारस्कर, कृषी विभागातील मंडळ अधिकारी निरसे, कृषी सहाय्यक एस.के. कसबे आदींनी फळबागांची पाहणी केली. किल्लारी येथील विश्वजित पाटील, गुंडाप्पा बिराजदार यांच्या उद्ध्वस्त बागांतील तडकलेल्या फळांची पाहणी केली. तसेच मंगरुळ, गुबाळ, नांदुर्गा येथेही भेटी देऊन गारपीट व पावसाचा आढावा घेतला. त्यांच्यासोबत मंडळ अधिकारी टी.जे. यादव, तलाठी आर.व्ही. कोनाळे, तलाठी विजयकुमार उस्तुरे आदींची उपस्थिती होती.
गेल्या पाच दिवसांपासून किल्लारी परिसरात अवकाळी पाऊस सुरू आहे. रविवारी रात्री या भागात गारपीट झाली. मंगरुळ, गुबाळ, नांदुर्गा, गांजनखेडा, नदी हत्तरगा, सांगवी, जेवरी, एकोजी मुदगड गावांना फटका बसला आहे. (वार्ताहर)