औरंगाबाद-नगररोडवर खड्डेभरणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 20:28 IST2019-02-16T20:28:30+5:302019-02-16T20:28:52+5:30
जागतिक बँक प्रकल्पाच्या अखत्यारीत येणाऱ्या औरंगाबाद-नगर रोडवर रस्ता सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून रस्त्यावरील खड्डेभरणीसह दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

औरंगाबाद-नगररोडवर खड्डेभरणी सुरू
वाळूज महानगर : जागतिक बँक प्रकल्पाच्या अखत्यारीत येणाऱ्या औरंगाबाद-नगर रोडवर रस्ता सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून रस्त्यावरील खड्डेभरणीसह दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच अनेक ठिकाणी सीलकोट करण्यात येत असून, दुभाजकावर काळे-पांढरे पट्टे मारण्यात येत आहेत.
औरंगाबाद-नगर महामार्गावर दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. या मार्गावर पावसाचे पाणी साचून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. याच बरोबर अपघातामुळे दुभाजकांची तुटफूट झालेली आहे. या महामार्गाची दुरुस्ती, दुभाजकाला रंगरंगोटी, वाहतूक सिग्नल ठिकाणी पट्टे मारणे आदी कामे करण्याचे आदेश जागतिक बँक प्रकल्प अधिकाºयांनी पथकर वसूल करणाºया के.टी.संगम कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले होते.
त्यानंतर ढोरेगाव ते गोलवाडी फाट्यापर्यंत ठिकठिकाणी डांबरीकरण करून सीलकोट करण्यात येत आहेत. याच बरोबर दुभाजकावर काळे-पांढरे पट्टेही मारण्यात येत असल्याचे के.टी.संगम कन्स्ट्रॅक्शनचे संजयसिंह यांनी सांगितले. लोखंडी जाळीच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नसल्यामुळे नागरिकांत नाराजीचा सूर उमटत आहे.