आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाचे काम सुरू

By Admin | Updated: July 26, 2014 01:07 IST2014-07-26T00:47:30+5:302014-07-26T01:07:48+5:30

नांदेड : येथील श्री गुरू गोविंदसिंघजी स्टेडियमचे आंतरराष्ट्रीय मानांकनाप्रमाणे विकास कामास आजपासून सुरूवात झाली असून स्टेडियमवर आता रणजीसह आंतराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट सामने होणार आहेत़

Starting the international cricket ground | आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाचे काम सुरू

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाचे काम सुरू

नांदेड : येथील श्री गुरू गोविंदसिंघजी स्टेडियमचे आंतरराष्ट्रीय मानांकनाप्रमाणे विकास कामास आजपासून सुरूवात झाली असून स्टेडियमवर आता रणजीसह आंतराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट सामने होणार आहेत़
सध्या स्टेडियमवर व्हीआयपी पॅव्हेलियन, अर्दन माऊंट, प्रेक्षक गॅलरीचे कामे पूर्ण झाले असून क्रिकेट मैदानाचे काम सुरू झाले आहे़ यामुळे नांदेडच्या क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माणझाले आहे़ नांदेडमध्ये यापुर्वी रणजी सामने झाले़ होते़ पण आताच्या मैदानाची अवस्था क्रिकेट खेळण्यायोग्य नव्हती़ नांदेडच्या सुनील जाधव, सुनील यादव, काजी शमाशुजमा उर्फ टिपू या तीन खेळाडूंची रणजी सामन्यासाठी निवड झाली़ परंतु शहरात सरावाची व्यवस्था नसल्याने त्यांना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुणे येथील क्रीडांगणावर जाऊन सराव व प्रशिक्षण घ्यावे लागले़
दोन वर्षापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी नांदेड येथे स्टेडियमला भेट देवून पाहणी केली होती़ या मैदानाच्या दुरूस्ती व अद्यावत सुविधाबाबत राज्य शासनाला शिफारस केली होती़ दरम्यान, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या सूचनेनुसार आयुक्त जी़ श्रीकांत यांनी या स्टेडियच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात आला़ सध्या मैदानातूनही मनपास वर्षाकाठी आज ८ लाख रूपये मिळतात़ दर्जा सुधारल्यानंतर हे उत्पन्न २० लाखापर्यंत जाणार आहे़ मनपाच्यावतीने अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार या स्टेडियमच्या विकासासाठी १ कोटी ८० लाख रूपये मंजूर झाले आहेत़ महापालिकेच्या श्री गुरूगोविंदसिंघजी स्टेडियम विकासाचे भुमिपुजन शुक्रवारी पालकमंत्री डी़ पी़ सावंत यांच्या हस्ते झाले़ अध्यक्षस्थानी महापौर अब्दुल सत्तार होते़ तर आ़ ओमप्रकाश पोकर्णा, आ़ अमरनाथ राजूरकर, जिल्हाधिकारी धीरजकुमार, जी़ श्रीकांत, स्थायी समितीचे सभापती उमेश पवळे, क्रिकेट संघटनेचे अशोक तेरकर, प्रा़ एऩ जी़ मेगदे उपस्थित होते़ यांची उपस्थिती होती़ यावेळी सावंत यांनी राज्याच्या क्रीडा धोरणात ग्रामीणप्रमाणे शहरी भागाचाही समावेश करण्यासाठी शासनाकडे आग्रह धरून त्यात नांदेडच्या श्री गुरूगोविंदसिंघजी स्टेडियमच्या विकासाला चालना देण्यासाठी कटीबद्ध राहू, अशी ग्वाही दिली़ तसेच हे काम दर्जेदारपणे आणि वेळेत पूर्ण करावे़ स्टेडिमय विकासाच्या पुढच्या टप्यात रात्रीदेखील सामने खेळण्याची व्यवस्था निर्माण करण्याची तयारी ठेवावी असेही ते म्हणाले़
(प्रतिनिधी)

Web Title: Starting the international cricket ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.