‘कलर्स आॅफ युनिटी’ला आजपासून सुरुवात
By Admin | Updated: August 13, 2016 00:04 IST2016-08-13T00:03:11+5:302016-08-13T00:04:40+5:30
औरंगाबाद : स्वातंत्र्यदिनानिमित्त लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब व प्रोझोन मॉल यांच्या संयुक्त विद्यमाने तीनदिवसीय ‘कलर्स आॅफ युनिटी’ या उपक्रमाची शनिवार १३ आॅगस्टपासून सुरुवात होत आहे.

‘कलर्स आॅफ युनिटी’ला आजपासून सुरुवात
औरंगाबाद : स्वातंत्र्यदिनानिमित्त लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब व प्रोझोन मॉल यांच्या संयुक्त विद्यमाने तीनदिवसीय ‘कलर्स आॅफ युनिटी’ या उपक्रमाची शनिवार १३ आॅगस्टपासून सुरुवात होत आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ७० व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून लोकमत टाइम्स कॅम्पस क्लबने धमाल कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या उपक्रमात विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यात नृत्य स्पर्धा घेण्यात येणार आहे तसेच बुद्धिबळ स्पर्धेत तर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटूला थेट आव्हान देता येणार आहे. याशिवाय देशभक्तीपर गीत व नृत्याचा कार्यक्रम, रॉक बँड, फ्लॅश मॉब, असे भरगच्च कार्यक्रम असणार आहेत. खास मिलिट्री बँडचेही आयोजन करण्यात आले आहे. सर्व कार्यक्रम प्रोझोन मॉल येथे होणार आहेत. याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सदस्य होणे गरजेचे
१३ रोजी या उपक्रमाला सुरुवात होणार आहे. दुपारी ३ वाजता नृत्य स्पर्धेची चाचणी घेण्यात येणार आहे. यात १५ वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी ग्रुप डान्स, सोलो आणि ड्युएट डान्स असणार आहे. यात स्पर्धकांना देशभक्तीपर गीतावर नृत्य सादरीकरण करावे लागणार आहे. यासाठी स्पर्धकांची नावनोंदणी शाळा किंवा त्या मुलांचे पालकही करू शकतात. सहभागी होणाऱ्या स्पर्धकांकडे कॅम्पस क्लबचे सदस्य असणे आवश्यक आहे. स्पर्धेसाठी अॅडव्हेंचर डान्स अकॅडमी विशाल भालेराव ८८८८२१०२०२ किंवा ९३७१७२७३७३ वर संपर्क साधवा.
रविवार १४ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘१ चेसमास्टर ३०० चॅलेंजर्स’ असे नाव देण्यात आले आहे. ही स्पर्धा सर्व बुद्धिबळपटूंसाठी खुली आहे. यात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू लेख मिठावाला यांना थेट आव्हान देण्याची सुवर्णसंधी स्पर्धकांना मिळणार आहे. स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे लेख मिठावाला एकाच वेळी ३०० बुद्धिबळपटंूसोबत खेळणार आहे. प्रत्येक खेळाडूला प्रमाणपत्र व बक्षीस जिंकण्याची संधी मिळणार आहे. सहभागी होण्यासाठी माय ब्रेन इन्स्टिट्यूट ९४२२२१०६५९ यांच्याशी संपर्क साधवा. दुपारी ४ वाजता नृत्याची अंतिम स्पर्धा घेण्यात येणार आहे. यात नृत्य चाचणीत निवडण्यात आलेल्या स्पर्धकांची अंतिम स्पर्धा होणार आहे.
१५ आॅगस्ट
दुपारी १२ वाजता- म्युझिक वर्ल्डच्या वतीने देशभक्तीपर गीतांचा व नृत्यांचा कार्यक्रम होणार आहे.
४दुपारी ३ वाजता- द टॅलेंट कंपनीच्या वतीने प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसोझाचा, सहायक कोरिओग्राफर रोनिक बाथेजा द्वारा फ्लॅश मॉब करण्यात येणार आहे.
४दुपारी ४ वाजता - कॅम्पस क्लबच्या समूह गायन स्पर्धेतील विजेत्यांचा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम होणार आहे.
४सायं. ६ वाजता - कॉसमॉस बँड (मिलिट्री बँड) सादरीकरण करणार आहे.
४सायं. ७ वाजता - एनओबीद्वारा मास म्युझिक पेट्रिआॅटिक परफॉर्मन्स सादर होणार आहे.
४रात्री ८ वाजता - शहरातील युवा कलाकारांचा रॉक बँडद्वारे देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम होणार आहे.
४विशेष म्हणजे लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब सदस्यांसाठी १३ ते १५ आॅगस्टदरम्यान किड्स लँड प्रोझोन मॉल येथे खरेदीवर ५० टक्के अतिरिक्त बोनस देण्यात येणार आहे.