साथरोगमुक्त पाणी गुणवत्ता जनजागृती मोहिमेस प्रारंभ
By Admin | Updated: May 26, 2015 00:48 IST2015-05-25T23:57:56+5:302015-05-26T00:48:51+5:30
बीड : पाणी गुणवत्ता अभियानांतर्गत स्वच्छ भारत मिशनच्या वतीने सोमवारी पाणी गुणवत्ता जनजागरण मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.

साथरोगमुक्त पाणी गुणवत्ता जनजागृती मोहिमेस प्रारंभ
बीड : पाणी गुणवत्ता अभियानांतर्गत स्वच्छ भारत मिशनच्या वतीने सोमवारी पाणी गुणवत्ता जनजागरण मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. जि. प. सभागृहात झालेल्या कार्यक्रमास सीईओ नामदेव ननावरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
२५ मे ते १५ जून या दरम्यान जिल्ह्यातील १०२४ ग्रामपंचायतींमध्ये साथरोगमुक्त पाणी गुणवत्ता जनजागरण मोहीम राबविली जाणार आहे. या अंतर्गत कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांना पिण्याचे शुध्द पाणी उपलब्ध करून देणे हे आपले सेवा कर्तव्य समजून काम करावे. गृहभेटी देऊन अशुध्द पाण्यामुळे होणाऱ्या रोगांची माहिती द्यावी. प्रतिबंधात्मक उपाययोजना करून जलकुंभ स्वच्छ ठेवावेत, अशा सूचना ननावरे यांनी दिल्या आहेत.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नईमोद्दीन कुरेशी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र मोराळे, जिल्हा आरोग्य अधिकारी एच. व्ही. वडगावे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी एल. आर. तांदळे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. चव्हाण, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी पी. के. पिंगळे यांची उपस्थिती होती. कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)