शहरातील पथदिवे सुरू करा

By Admin | Updated: September 2, 2014 01:50 IST2014-09-02T00:25:04+5:302014-09-02T01:50:07+5:30

जालना : गणेशोत्सवानंतर सुरू होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीला ८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेपासून सुरूवात होणार आहे. मात्र या दरम्यान भाविकांना त्रास होऊ नये, म्हणून पालिकेने

Start street paths in the city | शहरातील पथदिवे सुरू करा

शहरातील पथदिवे सुरू करा


जालना : गणेशोत्सवानंतर सुरू होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीला ८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेपासून सुरूवात होणार आहे. मात्र या दरम्यान भाविकांना त्रास होऊ नये, म्हणून पालिकेने विसर्जन मिरवणूक मार्गावर पथदिवे सुरू करून सर्वच खड्डे बुजवावे, असे आवाहन पोलिस प्रशासन, राजकीय पक्ष व गणेश महासंघाच्या संयुक्त बैठकीत करण्यात आले.
१ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीसंदर्भात पोलिस अधीक्षक कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी सहायक पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, उपअधीक्षक आय.टी. वसावे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनंत कुलकर्णी, संतोष पाटील, शंकर विभुते, अजय जगताप, विद्याधर काळे यांच्यासह महासंघाचे अध्यक्ष प्रशांत वाढेकर, कार्याध्यक्षा आयेशाखान मुलानी, मानाच्या गणपतीचे अध्यक्ष राजेंद्रकुमार आबड, नगराध्यक्ष पार्वताबाई रत्नपारखे, इकबाल पाशा, नगरसेवक शेख माजेदखान, काँगे्रसचे शहराध्यक्ष अ. हाफीज, शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले, गणेश सुपारकर, नगरसेविका जयश्री कुलकर्णी, अशोक पवार, राहूल देशपांडे आदींची उपस्थिती होती.
यंदाच्यावर्षी विसर्जन मिरवणूक १० तासांची राहणार असून दुपारी २ वाजता मिरवणूकीला सुरूवात होणार आहे. रात्री १२ वाजता ही मिरवणूक संपणार आहे. वेळेसंदर्भात प्रथमच नियोजन करण्यात आले आहे. यात सर्वांचा सहभाग राहणार आहे. महाप्रसाद व अन्नदान कार्यक्रमाचे नियोजनही यानुसारच करण्यात यावे, असे आवाहन केले आहे. नगर पालिकेने शहरातील मिरवणूक मार्गासह सर्वच पथदिवे सुरू करावेत. भक्तांना त्रास होऊ नये, यासाठी मिरवणूक मार्गावरील सर्वच खड्डे तात्काळ बुजवावे, असेही आवाहन पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
मिरवणूक कचेरी रोडवरून मोतीबागेपर्यंत जाणार असून परतणारी वाहने औरंगाबाद चौफुली मार्गावरून परत जातील. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होणार नाही, त्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. या बैठकीत गणेश विसर्जन मिरवुणकी दरम्यान येणाऱ्या अडचणी तसेच करावाच्या उपाययोजनांबाबत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले. शंकांचे निसन केले. (प्रतिनिधी)
जालना शहर काही महिन्यांपासून अंधारात असल्याने नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. नागरिकांमधूनही रोषही व्यक्त करण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने पथदिवे सुरु करणे अपेक्षित होते. आता विसर्जन मिरवणूकनिमित्ताने पथदिवे सुरु करण्याची मागणी शहरवासियांमधून जोर धरत आहे.

Web Title: Start street paths in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.