वडगाव गट नंबरमधील रजिस्ट्री सुरू करा
By | Updated: November 27, 2020 04:00 IST2020-11-27T04:00:09+5:302020-11-27T04:00:09+5:30
वाळूज महानगर : वडगाव-बजाजनगर ग्रामपंचायत हद्दीतील खाजगी गट नंबरमधील भूखंडाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू करण्यात यावेत, अशी मागणी करणारे निवेदन ...

वडगाव गट नंबरमधील रजिस्ट्री सुरू करा
वाळूज महानगर : वडगाव-बजाजनगर ग्रामपंचायत हद्दीतील खाजगी गट नंबरमधील भूखंडाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू करण्यात यावेत, अशी मागणी करणारे निवेदन सरपंच सचिन गरड यांनी ग्रामविकासमंत्री अब्दुल सत्तार यांना सादर केले.
वाळूज उद्योगनगरीत रोजगाराची संधी निर्माण झाल्यामुळे अनेक कामगार व गरीब नागरिकांनी घरे बांधण्यासाठी वडगाव परिसरातील खाजगी गट नंबरमध्ये बिल्डराकडून भूखंड खरेदी केले. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून खाजगी गट नंबरमधील भूखंडाच्या रजिस्ट्री बंद करण्यात आल्यामुळे भूखंड खरेदी करणारे नागरिक अडचणीत सापडले आहेत. बेघर कामगारांनी पै-पै जमा करून भूखंड खरेदी केले. खरेदीखताअभावी बँकाही कर्ज देत नसल्यामुळे घरे कशी बांधावीत, असा प्रश्न कामगारांना पडला आहे. नोटरीच्या आधारे भूखंड खरेदी केल्यामुळे याची ग्रामपंचायतीच्या दफ्तरीही नोंद घेतली जात नाही. ग्रामपंचायतीकडून बांधकाम परवानगीही मिळत नाही. या परिसरातील खाजगी गटनंबरमधील भूखंडांची रजिस्ट्री सुरू करण्यात यावी, यासाठी सरपंच सचिन गरड, उपसरपंच उषा हांडे यांनी नुकतीच ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेतली. सत्तार यांनी यासंदर्भात योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे सरपंच गरड यांनी सांगितले.
------------------------