फळबागा तोडीस सुरूवात
By Admin | Updated: July 14, 2014 01:03 IST2014-07-13T23:51:29+5:302014-07-14T01:03:07+5:30
हिंगोली : तालुक्यातील ‘आॅरेंज व्हिलेज’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या भांडेगाव, साटंबा परिसरात पावसाळ्यातही अजून पाऊस पडलेला नाही.

फळबागा तोडीस सुरूवात
हिंगोली : तालुक्यातील ‘आॅरेंज व्हिलेज’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या भांडेगाव, साटंबा परिसरात पावसाळ्यातही अजून पाऊस पडलेला नाही. त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी संत्र्याच्या बागांची मोठ्या प्रमाणात तोड करण्यास सुरूवात केली आहे.
भांडेगाव येथील श्रीराम नामाजी जगताप या शेतकऱ्याने तीन एकर शेतीमध्ये ८०० संत्र्याच्या झाडाची लागवड केली होती; परंतु निसर्ग पावसाने दगा दिला आणि त्यातच यावर्षी विहिरीची पाणीपातळी खालावली व बोअरसुद्धा आटत आल्यामुळे त्यांनी संत्र्याच्या १०० झाडांची तोडणी केली. त्यांनी दोन वर्षे संत्र्याचे चांगल्या प्रकारे उत्पन्न घेतले. परंतु या आता निसर्गाच्या बदलामुळे त्यांचे फार मोठे नुकसान झाले. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने या संत्र्याच्या झाडाला फळच राहिले नाही तर आता या झाडांना जगविण्यासाठी पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई भासत आहे. त्यामुळे या झाडांऐवजी जमीन रिकामी करून त्यामध्ये सोयाबीन किंवा इतर पीक घेतल्यास परवडेल असे या शेतकऱ्यांनी सांगितले. उन्हाळ्यात गारपीट झाल्यामुळे आलेले संत्रे पडून नुकसान झाले. भांडेगाव परिसरात आहे. काही शेतकऱ्यांकडे तर तब्बल २५०० संत्र्यांची झाडे आहेत. परंतु सध्या झालेल्या निसर्गाच्या बदलामुळे संत्र्याची झाडे टिकवणे कठीण झाले आहे. (प्रतिनिधी)
भांडेगावात सर्वाधिक लागवड क्षेत्र असलेल्या संत्र्याच्या बागा पाण्याअभावी यंदा धोक्यात आल्या आहेत.