एमफिल विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:03 IST2021-07-25T04:03:26+5:302021-07-25T04:03:26+5:30
कोरोना संसर्गामुळे गेल्या अनेक महिन्यापासून एमफिल विद्यार्थ्यांचे वसतिगृह बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक व मानसिक समस्यांचा सामना करावा लागत ...

एमफिल विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करा
कोरोना संसर्गामुळे गेल्या अनेक महिन्यापासून एमफिल विद्यार्थ्यांचे वसतिगृह बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक व मानसिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. एमफिल संशोधक विद्यार्थ्यांनी संशोधनाचे कार्य सुरू केले आहे. तसेच सारथी, बार्टी आणि महाज्योती या तिन्ही संस्थांनी फेलोशिपच्या जाहिराती काढल्या आहेत. हे विद्यार्थी संशोधनाचा अभ्यास ग्रंथालयात करण्यासाठी, फेलोशिपसाठी कागदपत्रे तयार करण्यासाठी येथे आले आहेत. त्यांना शहरात १५०० ते २५०० प्रति महिना देऊन भाड्याने रूम करून राहावे लागत आहे. हे सर्व विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत, याकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे.
निवेदनावर गणेश धांडे, सोनाजी गवई, दीपक पाईकराव, अनुश्री हिरादेवे, रेखा साळवे, निशा नरवाडे आदी संशोधक विद्यार्थ्यांच्या सह्या आहेत.