ऐतिहासिक दसरा महोत्सवास ‘आकाशवाणी’ने प्रारंभ

By Admin | Updated: September 26, 2014 00:37 IST2014-09-26T00:34:09+5:302014-09-26T00:37:18+5:30

हिंगोली : शहरातील ऐतिहासिक १६० व्या दसरा महोत्सवास बुधवारी रात्री श्री जलेश्वर मंदिरातील आकाशवाणीच्या कार्यक्रमाने प्रारंभ झाला.

Start by the historic Dasara festival 'Akashwani' | ऐतिहासिक दसरा महोत्सवास ‘आकाशवाणी’ने प्रारंभ

ऐतिहासिक दसरा महोत्सवास ‘आकाशवाणी’ने प्रारंभ

हिंगोली : शहरातील ऐतिहासिक १६० व्या दसरा महोत्सवास बुधवारी रात्री श्री जलेश्वर मंदिरातील आकाशवाणीच्या कार्यक्रमाने प्रारंभ झाला. प्रदर्शनीत यंदा मोफत प्रवेश असल्यामुळे अगदी पहिल्या दिवसापासून गर्दी जमली. आकाशी पाळणे, झोके आदी मनोरंजनापासून खाद्यपदार्थांपर्यंतची मेजवानी अनुभवता येणार आहे.
आकाशवाणीच्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी तुकाराम कासार, पोलिस अधीक्षक एन. अंबिका, महंत कमलदास महाराज, समिती सचिव तहसीलदार विद्याचरण कडवकर, पोलिस उपअधिक्षक सुनील लांजेवार, पोनि सतीश टाक, डॉ. विजय निलावार, गोविंदप्रसाद चौधरी, रमेशचंद्र बगडिया, ओमप्रकाश बियाणी, सुभाष महाराज पुरी, शांतीलाल जैन, राजु उपाध्ये, विश्वास नायक, बाबाराव घुगे, प्रकाश बांगर, गणेश साहू आदी उपस्थित होते. चांदतारा, क्रीसबी, ब्रेक डान्स, कोलंबस, बाऊंसर जंपींग पाळण्याचे खास आकर्षण आहे. मौत का कुआँ, ड्रॅगन ट्रेन आदी मनोरंजनाचे साहित्य दाखल झाले आहे. महिलांसाठी प्रदर्शनीत घरगुती साहित्य, सौंदर्य प्रसाधने आदी विकत घेता येणार आहेत. कृषी प्रदर्शनीच्या माध्यमातून शेतीची माहिती घेता येईल. यंदा मनोरंजन पार्क पोलिस कवायत मैैदानावर आहे.
रामजन्मोत्सव साजरा
शहरातील बद्रीनारायण मंदिरात गुरूवारी दुपारी पारंपारिक पद्धतीने वृंदावन येथील मंडळींकडून रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. नागरिकांनी एकमेकांना मिठाई वाटप केली. यावेळी महंत रामकिशोरदास, मंगल सोनी, गणेश साहू आदी उपस्थित होते. २६ सप्टेंबरपासून रामलीला मैदानावर रामलीला सादर होईल.
३६ मूर्तींची स्थापना
हिंगोली शहरात ३६ मंडळांकडून दुर्गा मुर्तींची स्थापना करण्यात आली आहे. बुधवारपर्यंत ३१ मंडळांनी परवाना मागितला होता. गुरूवारी त्यात वाढ झाली. प्रामुख्याने इंदिरा गांधी चौकातील त्रिशूल नवदुर्गा मंडळ, राजहंस दूर्गा मंडळ, रिसाला बाजार, गाडीपुरा, जवाहर रोड, गोलंदाज गल्लीत आकर्षक मूर्ती पहावयास मिळत आहेत. दुपारपासून सवाद्य मिरवणूक काढून मूर्तींची स्थापना करण्यात आली.
सिटी क्लब मैदानावर दांडिया
प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही दांडिया महोत्सव समितीकडून शहरातील सिटी क्लबच्या प्रांगणात २६ सप्टेंबरपासून दांडियास सुरूवात होणार आहे. ३० सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या दांडियात आॅर्केस्ट्रासारखे गाणे सादरीकरण केले जाणार आहेत. शुक्रवारी उद्घाटन पोलिस अधीक्षक एन. अंबिका यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उपनगाराध्यक्ष जगजीतराज खुराणा, रमेशचंद्र बगडिया, दिलीप चव्हाण, मिलींद यंबल, विनोद मुथा, गजेंद्र बियाणी, मनोज जैैन उपस्थित राहणार आहेत. त्यात सर्वांना मोफत प्रवेश दिला जाणार असून महिला आणि मुलांसाठी वॉटरप्रूप मंडपममध्ये स्वतंत्र आसनाची व्यवस्था केली आहे. पाच दिवसांत १५१ पारितोषिकांचे वाटप केले जाणार आहे. शेवटच्या दिवशी महापारितोषिक दिले जाईल. यशस्वीतेसाठी मधुर भंसाळी, प्रवीण सोनी, सुनील देवडा, पुष्पा सुराणा, रजनी पाटील, मुरली हेडा, मयूर सोनी, सुनील बगडिया, अजय जैन, आनंद अग्रवाल, पंकज सोनी, सर्वेश काबरा, शैलेश सोमानी, ओम नेनवानी, दुर्गादास वाकोडकर, कार्तिक चांडक, मयूर सोमानी, रवि नेनवानी आदींनी पुढाकार घेतला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Start by the historic Dasara festival 'Akashwani'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.