औरंगाबाद महामॅरेथॉनमध्ये ग्रुप बुकिंगला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:17 IST2017-11-07T00:17:34+5:302017-11-07T00:17:37+5:30
यंदा सर्व संरक्षक दले, पोलीस, होमगार्ड आणि विशेष राखीव दलातील धावपटूंसाठी दिले जाणारे विशेष बक्षीसही या सॅफरॉन लॅण्डमार्क प्रस्तुत औरंगाबाद महामॅरेथॉनचे वैशिष्ट्य ठरणार आहे.

औरंगाबाद महामॅरेथॉनमध्ये ग्रुप बुकिंगला सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : तंदुरुस्तीसाठी धावणे हा सर्वांसाठी जणू छंदच बनला आहे. मग याला औरंगाबाद शहर अपवाद कसे असेल? वैयक्तिक आणि सामूहिक नोंदणीवरही नागरिक, धावपटू, कंपन्यांतील कर्मचारी, महिला यांचा मोठ्या प्रमाणावर कल आढळून आलेला आहे.
यंदा सर्व संरक्षक दले, पोलीस, होमगार्ड आणि विशेष राखीव दलातील धावपटूंसाठी दिले जाणारे विशेष बक्षीसही या सॅफरॉन लॅण्डमार्क प्रस्तुत औरंगाबाद महामॅरेथॉनचे वैशिष्ट्य ठरणार आहे.
लोकमत समूहातर्फे याआधीही औरंगाबाद प्रीमिअर लीग, क्रीडा महोत्सव याचे यशस्वी आयोजन करताना खेळाडूंना एक मोठे व्यासपीठ मिळवून दिले आहे. यंदा १७ डिसेंबर रोजी होणारी औरंगाबाद महामॅरेथॉन आयोजित करून लोकमत समूहाने आणखी एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.
त्यानुसार नागरिक व खेळाडूंना फिटनेससाठी प्रेरणा मिळावी आणि त्यांना प्रेरित करून सक्रिय फिटनेसवर लक्ष केंद्रित करावे. त्याचप्रमाणे एक शिस्तबद्ध धावपटू कशाप्रकारे यश प्राप्त करू शकतो, हे महामॅरेथॉनद्वारे सिद्ध करणे हादेखील लोकमत समूहाचा प्रमुख उद्देश
आहे.
तसे पाहता मराठवाड्याची राजधानी ऐतिहासिक शहर औरंगाबादमध्ये तंदुरुस्तीविषयी जागरूकता निर्माण झाली आहे. दररोज आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता शहरातील विविध क्रीडांगणांवर नागरिक, महिला, खेळाडू रनिंगचा सराव करून स्वत:चा फिटनेस उंचावत आहेत.
त्यामुळे एक रनिंग कल्चरलचा विकास या ऐतिहासिक शहरात निर्माण झाला आहे आणि लोकमत समूहदेखील ऐतिहासिक औरंगाबाद शहरात क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी आणि ती फुलवण्यासाठी एक महत्त्वाचे योगदान देत आहे. गतवर्षी लोकमत समूहातर्फे आयोजित मॅरेथॉनमध्येदेखील अनेक रनिंग ग्रुप सहभागी झाले होते आणि या वेळेस त्यात नक्कीच जास्तीची भर पडणार आहे.