सेवाभावी संस्था, लोकसहभागातून ‘जुई’तील गाळ काढण्यास प्रांरभ

By Admin | Updated: May 11, 2016 00:47 IST2016-05-11T00:40:24+5:302016-05-11T00:47:26+5:30

भोकरदन : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई मध्यम प्रकल्प कोरडाठाक आहे. या धरणातील गाळ काढण्यासाठी यवतमाळ येथील दिलासा

Start of extinction of 'Jui' sludge from the charitable organization, people's participation | सेवाभावी संस्था, लोकसहभागातून ‘जुई’तील गाळ काढण्यास प्रांरभ

सेवाभावी संस्था, लोकसहभागातून ‘जुई’तील गाळ काढण्यास प्रांरभ


भोकरदन : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई मध्यम प्रकल्प कोरडाठाक आहे. या धरणातील गाळ काढण्यासाठी यवतमाळ येथील दिलासा सेवाभावी संस्था व लोकसहभागातून गाळ काढण्याचा शुभांरभ अप्पर जिल्हाधिकारी डॉ एऩ आऱ शेळके यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला.
येथील जुई धरण कोरडे पडल्यामुळे भोकरदन शहरासह २२ गावांवर पाणीटंचाईचे मोठे संकट निर्माण झाले आहे. मात्र येणाऱ्या काळात धरणातील पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी यवतमाळ येथील दिलासा सेवाभावी संस्थेने एक जेसीबी मशिन गाळ काढण्यासाठी दिले होते.
तसेच सदर मशिन चालविण्यासाठी लागणाऱ्या इंधनाचा खर्च हा लोकसहभागातून भागविल्या जाणार आहे. या गाळ काढण्याचा शुभारंभ अप्पर जिल्हाधिकारी डॉ. एऩआऱशेळके यांच्या हास्ते १० मे रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आला.
यावेळी तहसीलदार कोरडे, गाळमुक्ती अभियानचे संयोजक माजी नगराध्यक्ष अ‍ॅड हर्षकुमार जाधव, नगरसेवक शफीकखॉ पठाण, शब्बीर कुरेशी, त्र्यंबकराव पांबळे, नंदकिशोर गिऱ्हे, केशव पाटील जंजाळ, विनोद, जाधव, नारायण जिवरग, रणविंरसिह देशमुख, के़वाय़सोनोवणे, डॉ ओमप्रकाश गोधा, सुरेश तळेकर, राजेद्र दांरूटे, रामेश्वर जंजाळ, बबन जंजाळ, सुनील शिंदे, गणेश इंगळे, रावसाहेब कोरडे, डॉ. बावस्कर, संजय शास्त्री, रमेश कोलते, रमेश पगारे, शेख रईस, बाबूराव देशमुख, सुनील देशमुख, तलाठी अविनाश देवकर, यांच्यासह या परिसरातील शेतकरी तसेच ग्रामस्था मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Start of extinction of 'Jui' sludge from the charitable organization, people's participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.