जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेस प्रारंभ
By Admin | Updated: August 1, 2014 00:30 IST2014-07-31T23:49:02+5:302014-08-01T00:30:32+5:30
हिंगोली : शहरातील आदर्श महाविद्यालयाच्या मैदानावर १४, १७, १९ वयोगटातील जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेस बुधवारी प्रारंभ झाला. एकूण ९ संघानी या स्पर्धेत भाग घेतला.
जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेस प्रारंभ
हिंगोली : शहरातील आदर्श महाविद्यालयाच्या मैदानावर १४, १७, १९ वयोगटातील जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेस बुधवारी प्रारंभ झाला. एकूण ९ संघानी या स्पर्धेत भाग घेतला.
क्रीडा व युवक सेवा संचलनालय व जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांच्या वतीने होणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य विलास आघाव यांनी केले. अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडाधिकारी किशोर पाठक होते. प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा विभाग प्रमुख आनंद भट्ट, क्रीड अधिकारी संतोष फुफाटे होते. १४ वयोगटात २, १७ वयोगटात ५ आणि १९ वर्षांखाली वयोगटात २ संघांना सहभाग नोंदविला. उद्घाटनाचा सामना आदर्श महाविद्यालय व बहिर्जी महाविद्यालयाच्या संघात झाला. सूत्रसंचालन क्रीडा अधिकारी संजय बेत्तीवार यांनी केले. (प्रतिनिधी)