कॅम्पस क्लबच्या सदस्य नोंदणीस प्रारंभ

By Admin | Updated: July 7, 2014 00:43 IST2014-07-07T00:31:35+5:302014-07-07T00:43:17+5:30

औरंगाबाद : लोकमत टाइम्स कॅम्पस क्लबच्या सदस्य नोंदणीला रविवारी सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी पालक व मुलांनी लोकमत येथे व शहरातील विविध सेंटर्सवर सकाळपासून सदस्यत्व घेण्यासाठी गर्दी केली होती.

Start of Campus Club Membership | कॅम्पस क्लबच्या सदस्य नोंदणीस प्रारंभ

कॅम्पस क्लबच्या सदस्य नोंदणीस प्रारंभ

औरंगाबाद : लोकमत टाइम्स कॅम्पस क्लबच्या सदस्य नोंदणीला रविवारी सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी पालक व मुलांनी लोकमत येथे व शहरातील विविध सेंटर्सवर सकाळपासून सदस्यत्व घेण्यासाठी गर्दी केली होती.
दरवर्षी कॅम्पस क्लबतर्फे विविध कार्यक्रम घेण्यात येतात. त्यापैकी काही चित्रकला, बुद्धिबळ, डान्स स्पर्धा, आर्ट अँड क्राफ्ट ग्रीटिंग कार्ड, कलाविश्व ३ दिवसांची कार्यशाळा, आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा, बास्केट बॉल, टेबलटेनिस, किल्ला बनवा यासारख्या अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रमात मोफत प्रवेश मिळेल.
सदस्य नोंदणी शुल्क १५० रुपये असून, सदस्य होताच ताबडतोब वॉटर बॉटल भेट मिळणार आहे. यासोबत शहरातील विविध शॉप्समध्ये वाढदिवसाच्या दिवशी १,५०० रुपये किमतीच्या भेटवस्तू मिळतील.
लकी ड्रॉद्वारे दीड लाख रुपये किमतीची पारितोषिके जिंकण्याची संधी आहे. याद्वारे घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी कॅम्पस क्लबचे सदस्य असणे आवश्यक आहे. सदस्य नोंदणी सकाळी ११ ते ५ या वेळेत लोकमत भवन (जालना रोड) आणि शहरातील विविध सेंटर्सवर करता येईल.
‘कॅम्पस चॅम्प’ लवकरच भेटीला
तुमचा मित्र ‘कॅम्पस चॅम्प’ कॅम्पस क्लबतर्फे तुमच्या शाळेत लवकरच प्राचार्य व मुलांच्या भेटीसाठी आणण्यात येणार आहे. हा कॅम्पस चॅम्प सर्व शाळांमध्ये जाऊन कॅम्पस क्लबविषयी प्रचार करणार आहे.

Web Title: Start of Campus Club Membership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.