बससेवेस प्रारंभ
By Admin | Updated: August 7, 2014 01:29 IST2014-08-07T00:37:26+5:302014-08-07T01:29:20+5:30
धर्माबाद : येथून जवळच असलेल्या चोळाखा या गावी बिलोली आगाराने प्रवाशांच्या व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बससेवेचा प्रारंभ केला़

बससेवेस प्रारंभ
धर्माबाद : येथून जवळच असलेल्या चोळाखा या गावी बिलोली आगाराने प्रवाशांच्या व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बससेवेचा प्रारंभ केला़ स्वातंत्र्य- प्राप्तीच्या ६७ वर्षानंतर चोळाखा गावी एसटी बसचे दर्शन झाल्याने गावकऱ्यांत आनंद व्यक्त होत आहे़
गावातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी धर्माबाद, पाटोदा बु़, कारेगाव येथे दररोज ये-जा करतात़ चोळाखा येथून मुख्य रस्त्यावर येण्यासाठी दोन कि़मी़ चालत यावे लागत होते़ बाभळी बंधारा कृती समितीचे अध्यक्ष तथा राज्य परिवहन महामंडळाच्या नांदेड विभागाच्या सल्लागार समितीचे सदस्य नागोराव जाधव रोशनगावकर यांनी विभाग नियंत्रक नांदेड यांना चोळाखा गावास बससेवा सुरू करण्याबाबत पत्र पाठवून मागणी करण्यात आली होती़ या पत्राची विभाग नियंत्रकांनी दखल घेवून आगारप्रमुख बिलोली यांना बससेवा सुरू करण्याबाबत आदेशित केले़ नुकताच या बससेवेचा प्रारंभ बिलोली आगाराचे आगारप्रमुख आऱ एम़ राजमौळी, सरपंच भाऊसाहेब कदम यांच्या हस्ते करण्यात आला़ यावेळी चालक एम़पी़ यडपलवार, वाहक एस़एस़ जारीकोटकर यांचा सत्कार करण्यात आला़ वाहतूक निरीक्षक श्रीरामे, खुशाल ओलापाडे, के़एम़ पाटील, शाळेचे सहशिक्षक बी़यु़ नरवाडे, एस़डी़ नरवाडे, आऱएल़ हंबर्डे, के़पी़ पवारे, व्ही़व्ही़ गट्टुवार आदी उपस्थित होते़
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एसटी बससेवा सुरू झाल्याबद्दल के़एम़ पाटील शाळेचे अध्यक्ष विनायकराव शिंदे, सचिव गंगाधरराव पवार, मु़अ़ डी़वाय़ शिंदे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी स्वागत केले़ (वार्ताहर)