बिलोलीत ई-डिस्ट्रीक्टचा प्रारंभ
By Admin | Updated: August 18, 2014 00:33 IST2014-08-18T00:03:42+5:302014-08-18T00:33:32+5:30
बिलोलीत ई-डिस्ट्रीक्टचा प्रारंभ

बिलोलीत ई-डिस्ट्रीक्टचा प्रारंभ
बिलोली : तालुकापातळीवर ई-डिस्ट्रीक्ट आॅनलाईन प्रमाणपत्र वितरणाचा प्रारंभ करण्यात आला. जिल्ह्यातील सोळा तालुक्यांपैकी सर्वात प्रथम हा प्रयोग बिलोलीतून सुरु करण्यात आला आहे, गरजू नागरिकांना वेगवेगळे प्रमाणपत्र तत्काळ मिळणार आहेत. अशा अद्ययावत आॅनलाईन प्रणालीमुळे वेळेची व आर्थिक बचत होणार आहे.
शालेय जीवनात विद्यार्थ्यांना वेगवेगळी प्रमाणपत्र काढावी लागतात. उत्पन्नााचे प्रमाणत्र, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमेलियर, जातीचे प्रमाणपत्र आदी सह अन्य विविध प्रमाणपत्रांसाठी तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. अशा प्रमाणपत्राच्यावेळी खर्च देखील करावा लागतो, असा अनुभव आहे.
यापूर्वी सेतू सुविधा केंद्रातून प्रमाणपत्र वितरण प्रणाली सुरु आहे. आता आॅनलाईन प्रमाणपत्रातही मोठ्या सुधारणा होत आहेत. याचाच भाग म्हणून ई-डिस्ट्रीक्ट आॅनलाईन प्रमाणपत्र सोय सुरु झाली आहे. लाभार्र्थींचे मूळ प्रमाणपत्र संगणकात स्कॅनिंग करावे लागतील. शासनाच्या आॅनलाईन प्रणालीत अशा कागदपत्रांची पडताळणी होईल. तालुका पातळीवरुन लगेच संणकात तपासणी होईल व लाभार्थिंना प्रमाणपत्र उपलब्ध होईल. बिलोली तालुका पातळीवर सोमवारी ई-डिस्ट्रीक्टचा प्रारंभ उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे यांच्या हस्ते करण्यात आला. (वार्ताहर)