अनंतपाळ यात्रा महोत्सवास प्रारंभ
By Admin | Updated: May 22, 2016 00:03 IST2016-05-21T23:54:36+5:302016-05-22T00:03:59+5:30
शिरूर अनंतपाळ : ग्रामदैवत अनंतपाळ यात्रा महोत्सवास शनिवारपासून प्रारंभ झाला आहे़ यानिमित्त तीन दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम पार पडणार आहेत़

अनंतपाळ यात्रा महोत्सवास प्रारंभ
शिरूर अनंतपाळ : ग्रामदैवत अनंतपाळ यात्रा महोत्सवास शनिवारपासून प्रारंभ झाला आहे़ यानिमित्त तीन दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम पार पडणार आहेत़ उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक यांच्या हस्ते महापूजा करून महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला़ सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेल्या अनंतपाळ यात्रा महोत्सवास सुरुवात झाली आहे़ उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक आणि नायब तहसीलदार डी़ एऩ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी महापूजा झाली़ यावेळी अॅड़ संभाजीराव पाटील, नगराध्यक्षा भाग्यश्री देवंग्रे, उपनगराध्यक्ष संतोष शेटे, जि़प़सदस्या अॅड़ जयश्री पाटील, पोलिस निरीक्षक अशोक अनंत्रे, नगरसेवक सुमित दुरुगकर, विशाल गायकवाड, देवस्थानचे अध्यक्ष विठ्ठल उंबरगे, परमेश्वर तोंडारे आदी उपस्थित होते़ महोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रम होत आहेत़