स्थायी समिती सभापती निवडणूक; बुधवारी पासून होणार अर्ज वाटप

By Admin | Updated: June 1, 2014 00:54 IST2014-06-01T00:37:47+5:302014-06-01T00:54:10+5:30

औरंगाबाद : मनपा स्थायी समिती सभापती व विषय समिती सभापती निवडणुकीसाठी ४ व ५ जून रोजी अर्ज वाटप होणार आहेत.

Standing Committee Chairman Election; Allocation of applications to be held from Wednesday | स्थायी समिती सभापती निवडणूक; बुधवारी पासून होणार अर्ज वाटप

स्थायी समिती सभापती निवडणूक; बुधवारी पासून होणार अर्ज वाटप

औरंगाबाद : मनपा स्थायी समिती सभापती व विषय समिती सभापती निवडणुकीसाठी ४ व ५ जून रोजी अर्ज वाटप होणार आहेत. ५ जून रोजी सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. ६ जून रोजी सकाळी १० वा. पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांच्या उपस्थितीत स्थायी समिती सभापतीची निवडणूक होईल. तत्पूर्वी अर्ज मागे घेण्यासाठी वेळ देण्यात येईल. सेनेतील सदस्य हे... त्र्यंबक तुपे, विजय वाघचौरे, अनिल जैस्वाल यांची आज निवड झाली. जगदीश सिद्ध, सुरेंद्र कुलकर्णी, प्रीती तोतला हे मागील वर्षीच्या स्थायी समितीतील सदस्य आहेत. भाजपा सदस्य हे... अनिल मकरिये, संजय चौधरी यांची आज निवड झाली. ऊर्मिला चित्ते या मागील वर्षीच्या सदस्य आहेत. आघाडीचे सदस्य हे... काशीनाथ कोकाटे (राष्ट्रवादी काँग्रेस), जहांगीर खान अब्बास खान, रवी कावडे यांची काँगे्रसकडून आज निवड झाली. परवीन कैसर खान (राष्ट्रवादी काँग्रेस), फिरदौस फातेमा खान, सत्यभामा शिंदे, मीर हिदायत अली (काँग्रेस) हे सदस्य स्थायी समितीमध्ये राहतील. शिवसेनेत स्पर्धा आ. संजय शिरसाट यांनी पश्चिम मतदारसंघात सभापतीपद मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. विजय वाघचौरे यांच्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. जगदीश सिद्ध यांना खा.चंद्रकांत खैरे यांनी शब्द दिला आहे. या दोघांच्या भांडणात कुणाचा नंबर लागतो याकडे लक्ष आहे.

Web Title: Standing Committee Chairman Election; Allocation of applications to be held from Wednesday