लर्निंगसाठी स्टॉल चाचणी
By Admin | Updated: April 2, 2017 00:28 IST2017-04-02T00:25:12+5:302017-04-02T00:28:32+5:30
जालना : दोन चाकी व चारचाकी वाहन शिकण्यासाठी नव्या स्वरूपात स्टॉल नावाची लर्निंग टेस्ट द्यावी लागणार आहे.

लर्निंगसाठी स्टॉल चाचणी
जालना : दोन चाकी व चारचाकी वाहन शिकण्यासाठी नव्या स्वरूपात स्टॉल नावाची लर्निंग टेस्ट द्यावी लागणार आहे. येथील सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नवीन टेस्टची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
नवीन टेस्ट सुरू होण्यापूर्वी एका स्क्रीनवर सामूहिक परीक्षा देण्यात येत होती. उमेदवारांना चुक किंवा बरोबरचे बटन दाबावे लागे. आता मात्र उमेदवाराला संगणकावर प्रत्यक्ष परीक्षा द्यावी लागणार आहे. वीस प्रश्न विचारण्यात येणार असून, त्यापैकी ९ प्रश्नांची उत्तरे बरोबर आली तर उमेदवार पास होणार अन्यथा पुन्हा परीक्षा द्यावी लागणार. केंद्रीय मोटर वाहन कायदा १९८८ नुसार ही परीक्षा घेण्यात येत आहे.
जालना आरटीओ कार्यालयात सहा संगणकांची व्यवस्था करण्यात आली आहे. संगणकावर प्रश्न विचारण्यात येणार असून, बरोबर उत्तर आल्यास हिरवा संकेत तर चुकीचे उत्तर आल्यास लाल संकेत मिळेल. उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत परीक्षा देता येईल.
याविषयी सहाय्यक परिवहन अधिकारी ए.ए.खान म्हणाले, आठवडाभरापासून जालना कार्यालयात नवीन ओदशानुसार परीक्षा घेण्यात येत आहे. सध्या सहा संगणकांची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा पास झाल्यास उमेदवारास थेट लर्निंग लायन्ससची प्रिंट मिळणार आहे. (प्रतिनिधी)