शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

'बहुमजली इमारतीला वर जाण्यास पायऱ्या,लिफ्ट नाही'; नगरनाका रेल्वे उड्डाणपुलाची अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 20:26 IST

रेल्वेचे वकील मनीष नावंदर यांनी ती छायाचित्रे आणि कामाचा थोडक्यात अहवाल न्यायालयात सादर केला.

औरंगाबाद : बहुमजली इमारत तयार झाली. मात्र, इमारतीवर जाण्यासाठी पायऱ्या अथवा उद्वाहन (लिफ्ट) नाही, अशी नगरनाका येथील रेल्वे उड्डाणपुलाची अवस्था असल्याचे गुरुवारी सुनावणी दरम्यान रेल्वेतर्फे सादर करण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या छायाचित्रांवरून निदर्शनास आले.

रेल्वेचे वकील मनीष नावंदर यांनी ती छायाचित्रे आणि कामाचा थोडक्यात अहवाल न्यायालयात सादर केला. मात्र, नगरनाका येथील रेल्वे उड्डाणपूल आणि शिवाजीनगर येथील रेल्वे भुयारी मार्गाच्या कामाची सद्यस्थिती, झालेले आणि राहिलेले काम, पूर्णत्वासाठीचा प्रस्तावित अवधी आदी तांत्रिक बाबी सविस्तरपणे न्यायालयात मांडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठतम अधिकाऱ्यांनी हजर राहण्याची अपेक्षा खंडपीठाने व्यक्त केली. या जनहित याचिकेवर शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र व्ही. घुगे आणि न्या. पानसरे यांच्या खंडपीठात सुनावणी होणार आहे.

ॲड. नावंदर यांनी खंडपीठात निवेदन केले की, नगरनाका येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. या उड्डाणपुलाला जोडणारे अहमदनगर ते औरंगाबाद आणि औरंगाबाद ते अहमदनगरकडे जाणाऱ्या रस्त्यांचे (ॲप्रोच रोड) सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात येणारे काम पूर्ण झाल्यास हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला जाऊ शकेल. अहमदनगरकडील रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून औरंगाबादकडील रस्त्याचे काम अद्याप सुरू झाले नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.शिवाजीनगर येथील रेल्वे भुयारी पुलासाठी भूसंपादन चालू असून त्याबाबतची जाहीर सूचना प्रसिद्ध झाली आहे. ज्यांची जमीन या कामासाठी संपादित केली जाणार आहे, त्यांची माहिती महापालिकेने उपलब्ध करून दिल्यास भूसंपादनाचे काम जलदगतीने होईल, असे सहायक सरकारी वकील सुजीत कार्लेकर यांनी निवेदन केले. त्यावर तशा सूचना विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांना देण्याचे ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांनी निवेदन केले. महापालिकेने येथील कामाचे ४ कोटी रुपये दिले असल्याचे ते म्हणाले. सुनावणीस याचिकाकर्ता ॲड. रुपेश जैस्वाल, रस्ते महामंडळातर्फे ॲड. एस. व्ही. अदवंत आदी उपस्थित होते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठrailwayरेल्वे