कर्मचारी वेळेवर हजर; दलाल झाले गायब

By Admin | Updated: July 10, 2014 01:03 IST2014-07-10T00:38:04+5:302014-07-10T01:03:27+5:30

तळणी : येथील जिल्हा मध्यवर्ती सहक ारी बँके त भरपाई वाटपात दलाल बाहेर तर कर्मचारी वेळेवर हजर झाल्याने गारपीटग्रस्तांना दिलासा मिळाला.

Staff appear in time; The broker disappeared | कर्मचारी वेळेवर हजर; दलाल झाले गायब

कर्मचारी वेळेवर हजर; दलाल झाले गायब

तळणी : मंठा तालुक्यातील तळणी येथील जिल्हा मध्यवर्ती सहक ारी बँके त गारपीटग्रस्तांची नुसकान भरपाई वाटपात विलंब करुन दलालांकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याचे वृत्त मंगळवारी लोकमतमध्ये प्रसिध्द होताच दलाल बाहेर तर कर्मचारी वेळेवर हजर झाल्याने गारपीटग्रस्तांना दिलासा मिळाला.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत दलालांचा सुळसुळाट व कर्मचारी कार्यालयीन वेळेवर येत नसल्याने गारपीटग्रस्तांना चक रा माराव्या लागत होत्या. बँकेचे शाखाधिकारी व भागचौकसनीस हे बॅके त वेळेवर येत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. खातेदारांना योग्य माहिती देत नसल्याने शेतक ऱ्यांना कि ती व क धी नुक सान भरपाई मिळणार? असा प्रश्न गारपीटग्रस्तांना पडला होता. याबाबत े मंगळवारी वृत्त प्रसिध्द होताच बँक ेतील दलाल बाहेर तर क र्मचारी वेळेवर हजर झाल्याने तात्काळ गारपीटग्रस्तांना नुकसान भरपाई मिळाल्याने दिलासा मिळाला. भागचौकसनीस आर.बी. बाहेकर हे पंढरपूरला गेल्याने अनेकांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आलेले नाहीत. गारपीटग्रस्त शेतकरी त्रस्त असून खातेदारांना पुस्तिका नाहीत.
भरपाईची यादी लावली नाही, खातेदारांनी खाते नंबर दिल्याशिवाय पैसे जमा होणार नसल्याचे सांगून कर्मचारी दिशाभूल करीत असलचा आरोप राष्ट्रवादीचे कैलास सरकटे, ज्ञानेश्वर राऊत यांनी केला. (वार्ताहर)

Web Title: Staff appear in time; The broker disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.