एसटीबस आडवून काचा फोडल्या

By Admin | Updated: August 7, 2014 01:26 IST2014-08-07T00:21:49+5:302014-08-07T01:26:19+5:30

दैठणा : पोखर्णी - पाथरी रस्त्यावरील भारस्वाडा शिवारात दुचाकीवरील दोघांनी संगनमत करून बस अडवून काचा फोडल्याची घटना ५ आॅगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.

Stabbing the sticks | एसटीबस आडवून काचा फोडल्या

एसटीबस आडवून काचा फोडल्या

दैठणा : पोखर्णी - पाथरी रस्त्यावरील भारस्वाडा शिवारात दुचाकीवरील दोघांनी संगनमत करून बस अडवून काचा फोडल्याची घटना ५ आॅगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.
परतूर आगाराची बस क्रमांक एम. एच. २० - १५२७ ही मंगळवारी लातूर येथून परतूरकडे जाण्यासाठी निघाली. ही बस पोखर्णी - पाथरी या रस्त्यावरील भारस्वाडा शिवारात आल्यानंतर दुचाकी क्र. एम. एच. २२-एल.७५२२ बससमोर दुचाकी आडवी लावली. दुचाकीवरील उद्धव राऊत व दामू राऊत (रा. रामपुरी) यांनी संगनमत करून बसवर दगडफेक करून काचा फोडून ४० हजारांंचे नुकसान केले आहे. या प्रकरणी बसचालक बाळू भगवान इंगोले यांच्या तक्रारीवरून दैठणा पोलिस ठाण्यात वरील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास बीट जमादार सुभाष चव्हाण हे करीत आहेत. (वार्ताहर)
प्रवाशांची झाली तारांबळ
दुचाकीवरील दोघे जण अचानक बससमोर आडवे होऊन गाडीवर दगडफेक केली़ यामुळे बसमध्ये असलेल्या प्रवाशांची तारांबळ उडाली़ काय घडले हे प्रवाशांना कळालेच नाही़ खाली येईपर्यंत या युवकांनी बसच्या काचा फोडण्यास सुरुवात केली़
या घटनेमध्ये अंदाजे बसचे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे़
या प्रकरणी दैठणा पोलिस ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अद्यापपर्यत दोन आरोपींना पोलिसांनी अटकच केली नाही़

Web Title: Stabbing the sticks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.