एसटी कामगारांना थकलेली रक्कम आठवडाभरात मिळेल

By Admin | Updated: August 11, 2014 01:54 IST2014-08-11T01:21:19+5:302014-08-11T01:54:44+5:30

नांदेड : शासनाकडून महामंडळास देय असलेली ५०० कोटी रूपये ११ आॅगस्ट रोजी महामंडळास रोखीने प्राप्त होणार असून येत्या आठवडाभरात सदरील रक्कमेतील

ST workers get tired amounts within a week | एसटी कामगारांना थकलेली रक्कम आठवडाभरात मिळेल

एसटी कामगारांना थकलेली रक्कम आठवडाभरात मिळेल




नांदेड : शासनाकडून महामंडळास देय असलेली ५०० कोटी रूपये ११ आॅगस्ट रोजी महामंडळास रोखीने प्राप्त होणार असून येत्या आठवडाभरात सदरील रक्कमेतील कामगारांचे महामंडळाकडे थकित असलेले २१० कोटी रूपये पुढील आठवडाभरात कामगारांना रोख स्वरूपात मिळतील, अशी माहिती महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी दिली़
प्रशासन व शासनस्तरावर नुकत्याच झालेल्या बैठकीत उद्योग व कामगारांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाल्यामुळे १२ आॅगस्ट रोजी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतर्फे करण्यात येणारे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचेही ताटे यांनी सांगितले़ तसेच शासनाकडून मिळत असलेल्या रक्कमेतील २१० कोटी रूपये वाटपाची तारीख निश्चित करण्यासाठी १२ आॅगस्ट रोजी एसटी महामंडळाचे चेअरमन यांच्यासमवेत संघटना पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे़ त्यामुळे गणेशोत्सवापुर्वी एसटी कामगारांना कामगार करारातील थकबाकीची रक्कम प्रत्यक्ष मिळू शकते़
या बैठकीत प्रवासी कराचा दर १७़५ टक्क्यावरून १० टक्के करण्याच्या शासकीय निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यमंत्री मंडळापुढे प्रस्ताव सादर करून त्याची मान्यता मिळविण्याचे मान्य केल्याचे ताटे यांनी सांगितले़ विविध घटकांना दिल्या जाणाऱ्या सवलतीपोटी महामंडळास देय असलेले १४४७ कोटी रूपये मिळण्यासाठी एसटी महामंडळ करीत असलेल्या पाठपुराव्याची दखल घेवून संबंधित विभागांना पुन्हा आदेश देण्याचे मान्य केले आहे़
रा़ प़ सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या पत्नीस, पतीस ५०० रूपये भरून वर्षभर मोफत प्रवास पास देण्याचा प्रस्ताव महामंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येणार आहे़ यासह विविध मागण्यावर शासन आणि प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने मुंबईत १२ आॅगस्ट रोजी होणारे धरणे आंदोलन स्थगित केल्याचे संघटनेचे सरचिटणीस ताटे, राज्य महिला संघटक शीला नाईकवाडे, प्रादेशिक सचिव एम़ बी़ बोर्डे आदींनी कळविले आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: ST workers get tired amounts within a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.