राज्य परिवहनच्या एसटीची तिजोरी हलविली
By Admin | Updated: September 29, 2014 00:41 IST2014-09-29T00:30:59+5:302014-09-29T00:41:44+5:30
लातूर : येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने लातूर आगारामार्फत सुरु असलेला तिकीट व रोकड विभागाच्या सुरक्षिततेची जबाबदारी आगार प्रमुखावर होती़

राज्य परिवहनच्या एसटीची तिजोरी हलविली
लातूर : येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने लातूर आगारामार्फत सुरु असलेला तिकीट व रोकड विभागाच्या सुरक्षिततेची जबाबदारी आगार प्रमुखावर होती़ त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकातील तिजोरी आता शिवाजी चौकातील लातूर आगारात आणली आहे़
दिवसभरात १०४ एसटी बसेसच्या माध्यमातून ४६,६७१ किलोमिटरचे अंतरचा प्रवास केला जातो़ या माध्यमातून प्रत्येक गाडीचा ये-जा करण्याच्या ट्रीप १५५ होतात़ या ट्रीपच्या माध्यमातून दिवसाकाठी ११,३७,८५२ रुपयाचा महसुल जमा होतो़ सध्यापर्यंत हा वाहकाकडील महसुल जमा करण्याची प्रक्रिया लातूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात होती़ परंतु, सुरक्षिततेचा विषय असल्याने विभाग नियंत्रक डी़बी़माने व आगारप्रमुख कुरेशी यांनी हा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)
लातूर आगाराचा तिकीट व रोकड विभाग यापूर्वी मध्यवर्ती बसस्थानकात होता़ त्यामुळे चालक आगारातून गाडी घेवून बसस्थानकात येईपर्यंत वाहक मात्र बेपत्ता रहायचा. त्याला शोधण्यासाठी चालकाचा बराच वेळ जात असल्यामुळे व महामंडळातील प्रशासनाने लातूर आगारातील ४०० वाहक चालकांना शिस्त लावण्यासाठी तिकीट व रोकड विभाग मुख्य आगारात हलविले असल्याची चर्चा कर्मचाऱ्यात आहे़