एस.टी. कामगार संघटनेचे निदर्शने

By Admin | Updated: May 28, 2014 00:38 IST2014-05-28T00:35:01+5:302014-05-28T00:38:44+5:30

परभणी : कामगार कराराची थकबाकी देण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी येथील एस.टी. कामगार संघटनेच्या वतीने २७ मे रोजी परभणी येथील विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

S.T. Trade union protests | एस.टी. कामगार संघटनेचे निदर्शने

एस.टी. कामगार संघटनेचे निदर्शने

परभणी : कामगार कराराची थकबाकी देण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी येथील एस.टी. कामगार संघटनेच्या वतीने २७ मे रोजी परभणी येथील विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. दहा टक्के वाढीव महागाई भत्ता चालू करावा, मान्य केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, करार, कायदे, परिपत्रकांचा भंग करुन घेतलेले निर्णय रद्द करावेत, नियमबाह्य दिलेल्या शिक्षा रद्द करा, करारात मान्य केलेल्या बाबींची अंमलबजावणी करा, शासनाने महामंडळास देय असलेले १८४० कोटी रोख स्वरुपात द्यावेत, इतर राज्याप्रमाणे प्रवासी कर व पथकर माफ करावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. या मागण्या मान्य न झाल्यास ४ जून रोजी आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. या आंदोलनात अशोक शेंडगे, कालिदास पुरी, विजयकुमार कापसे, लिंबाजी राऊत, उत्तम जाधव, रामभाऊ देवगुडे, मनोहर गावंडे, मिर्झा, अकबर अली खान, माधव कांबळे, संगिता मोरे, गौतमी घाडगे, रेखा नरवाडे, मीनाक्षी कपाटे, लता राऊत, वंदना तरकसे, भुजबळ, वैद्य, जाधव, तालेवार आदींसह बहुसंख्य सभासदांनी सहभाग घेतला.(प्रतिनिधी)

Web Title: S.T. Trade union protests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.