खाजगीतून एस.टी. बसगाड्यांची बांधणी

By Admin | Updated: June 27, 2016 01:06 IST2016-06-27T00:33:02+5:302016-06-27T01:06:04+5:30

औरंगाबाद : एस. टी. महामंडळाने पुरविलेल्या चेसीसवर बसेसच्या बांधणीसाठी सध्या निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. स्टीलचा वापर करून डीलक्स वर्गातील

ST from Private Boundary construction | खाजगीतून एस.टी. बसगाड्यांची बांधणी

खाजगीतून एस.टी. बसगाड्यांची बांधणी


औरंगाबाद : एस. टी. महामंडळाने पुरविलेल्या चेसीसवर बसेसच्या बांधणीसाठी सध्या निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. स्टीलचा वापर करून डीलक्स वर्गातील बसेसची निर्मिती केली जाणार असल्याने ‘एस. टी.’ चा प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. परंतु महामंडळाच्या स्वत:च्या कार्यशाळा असताना अशा प्रकारे खाजगीतून ‘एस. टी.’ ची बांधणी करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे महामंडळाचे खाजगीकरण करण्यावर भर दिला जात असल्याच्या प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांमधून उमटत आहेत.
एस. टी. महामंडळाच्या दापोली, नागपूर आणि औरंगाबाद येथील कार्यशाळांमध्ये बसेसची बांधणी केली जाते. बसेसच्या बांधणीसाठी आवश्यक ती सर्व यंत्रणा याठिकाणी उपलब्ध आहे. कुशल कर्मचारी वर्गही उपलब्ध आहे. बसगाड्यांमधील मागे-पुढे होणारी आसन व्यवस्था आणि त्यावर प्रवाशांना झोप काढता येणारी सुविधा म्हटली की, केवळ खाजगी बसगाड्याच नजरेसमोर येतात. परंतु अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुशबॅक आसन व्यवस्था राहणाऱ्या एशियाड बसेसची बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. एकट्या एस. टी. महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत टप्प्याटप्प्याने २३७ एशियाड बसगाड्या बांधण्यात आल्या. त्यामुळे आता खाजगी आणि एस. टी. महामंडळाच्या शिवनेरी बसगाड्यांप्रमाणेच एशियाड बसेसचा प्रवास अधिक आरामदायक होत आहे. यावरून कार्यशाळांची क्षमता स्पष्ट होते. कार्यशाळांमध्ये सर्व सुविधा असतानाही महामंडळ बस बांधणीसाठी निविदा प्रक्रिया राबवीत आहे. पुरविलेल्या चेसीसवर बसबॉडीचे आरेखन करून, बस बांधणीसाठीसाठी ई-निविदा मागविण्यात आल्या आहेत.

Web Title: ST from Private Boundary construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.