शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

‘एस.टी.’ चा प्रवास आजपासून महागणार

By admin | Updated: August 22, 2014 00:19 IST

औरंगाबाद : ‘आपोआप भाडेवाढ ’ या सूत्रात अंतर्भूत असणाऱ्या डिझेलच्या दरवाढीचा फटका २२ आॅगस्टपासून पुन्हा एकदा एसटी प्रवाशांच्या खिशाला बसणार आहे.

औरंगाबाद : ‘आपोआप भाडेवाढ ’ या सूत्रात अंतर्भूत असणाऱ्या डिझेलच्या दरवाढीचा फटका २२ आॅगस्टपासून पुन्हा एकदा एसटी प्रवाशांच्या खिशाला बसणार आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे राज्य परिवहन महामंडळाने प्रवास भाड्यात सरासरी ०.८० टक्का दरवाढ जाहीर केली आहे. २०१४ या वर्षात चौथ्यांदा एसटी महामंडळाने भाडेवाढ केली आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना किमान एक रुपयांपासून जवळपास ९ रुपयांपर्यंत भाडेवाढीचा फटका बसणार आहे. डिझेलच्या दरात सतत होणाऱ्या दरवाढीमुळे प्रवास भाड्यात वाढ करणे भाग पडत असल्याचे राज्य परिवहन महामंडळाकडून सांगितले जाते. यामुळे गेल्या २१ दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ करण्यात आली आहे. साध्या, जलद, रात्रसेवा आणि निमआराम सेवेत प्रतिसहा कि. मी. साठी ५ पैसे अशी दरवाढ केली आहे. साध्या, जलद सेवेच्या पहिल्या २७ कि. मी. च्या प्रवासासाठी मात्र दरवाढ करण्यात आलेली नाही. २२ आॅगस्टपूर्वी आगाऊ आरक्षण केलेल्या आणि २२ आॅगस्ट रोजी अथवा त्यानंतर प्रवास सुरू करणाऱ्या प्रवाशांकडून प्रवासाच्या वेळी फरक वसूल केला जाईल. परंतु ज्या प्रवाशांचा प्रवास २१ आॅगस्ट रोजी सुरू होऊन २२ आॅगस्ट अथवा त्यानंतर संपणार असेल अशा प्रवाशांकडून फरक वसूल केला जाणार नाही. सर्वसामान्य प्रवाशांच्या सुविधेसाठी एसटी महामंडळाची बससेवा महत्त्वाची ठरते. सुरक्षित आणि किफायतशीर प्रवासामुळे एसटी बसेसला सर्वसामान्यांकडून प्राधान्य दिले जाते. सातत्याने होणाऱ्या भाडेवाढीविषयी प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.एसटी महामंडळाने ३१ जुलै रोजी ०.८१ टक्क्याने भाडेवाढ केली होती. त्यानंतर डिझेलच्या दरात झालेली दरवाढ लक्षात घेऊन २२ आॅगस्टपासून पुन्हा दरवाढ करण्याचे जाहीर केले आहे.