एसटी चालक, वाहकास मारहाण

By Admin | Updated: December 14, 2015 23:53 IST2015-12-14T23:52:43+5:302015-12-14T23:53:04+5:30

तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथून अंबडकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसचालक तसेच वाहकास दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तरुणांनी मारहाण केली

ST driver, beating carrier | एसटी चालक, वाहकास मारहाण

एसटी चालक, वाहकास मारहाण


तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथून अंबडकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसचालक तसेच वाहकास दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तरुणांनी मारहाण केली. बसच्या पत्र्यावर चाकू मारून दर्शनी भागाच्या काचा फोडल्या. ही घटना सोमवारी सकाळी साडेदहा वाजता घडली.
अंबड आगाराची भोगाव ते अंबड (एमएच१४- बीटी ०२४१) ही बस रूई गावाजवळ आली असता तीर्थपुरीकडून (एमएच २०-डीएल २२२७) या दुचाकीवरून आलेल्या दोन तरूणांनी बस अडवली. चालक जे.एन.जाधव यांच्यावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न करून मारहाण केली. तर वाहक जी. व्ही. गिराम यांना धक्का दिल्याने आठशे रुपये गहाळ झाले. बसच्या काचा फोडल्याने महामंडळाचे २५ हजारांचे नुकसान झाले.
अंबडकडे जाणाऱ्या बसमध्ये ५० प्रवासी होते. अचानक घडलेल्या प्रकारामुळे सर्वच प्रवासी घाबरले होते. काही प्रवाशांनी मध्यस्ती केल्यानंतर ते तरूण तीर्थपुरीकडे रवाना झाले. दरम्यान, या प्रकरणी चालक जाधव यांनी दोन तरूणांविरूद्ध गोंदी पोलिस ठाण्यात तक्रारी दिली.

Web Title: ST driver, beating carrier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.