एसटी बसचालक,वाहकाला रिक्षाचालकाची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:04 IST2021-02-28T04:04:57+5:302021-02-28T04:04:57+5:30

कृष्णा दादाराव उसरे (वय २८, रा.जाधववाडी) असे आरोपीचे नाव आहे. याविषयी सिटी चौक पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार संतोष ...

ST bus driver, rickshaw puller beating the carrier | एसटी बसचालक,वाहकाला रिक्षाचालकाची मारहाण

एसटी बसचालक,वाहकाला रिक्षाचालकाची मारहाण

कृष्णा दादाराव उसरे (वय २८, रा.जाधववाडी) असे आरोपीचे नाव आहे. याविषयी सिटी चौक पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार संतोष मच्छिंद्र जाधव हे एसटी चालक आहेत. शुक्रवारी दुपारी सिल्लोडहून ते औरंगाबादला प्रवासी वाहतूक करीत होते. हर्सूल टी पॉइंट येथे दिल्ली गेटकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांनी बस उभी केली आणि बसमधून काही प्रवाशांना उतरविले. यावेळी अचानक त्यांच्या बससमोर आरोपीने त्याची रिक्षा उभी केली होती. जाधव आणि एसटीच्या वाहकांनी त्याला रस्त्यावरून रिक्षा बाजूला घेण्यास सांगितले. याचा त्याला राग आला आणि त्याने जाधव आणि वाहकाला शिवीगाळ केली. वाहक बसमधून उतरले असता आरोपीने त्यांना लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी केले. या घटनेनंतर बसचालक आणि वाहक यांनी थेट सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी रिक्षाचालक कृष्णा उसरेविरुद्ध गुन्हा नोंदविला.

Web Title: ST bus driver, rickshaw puller beating the carrier