श्री सिद्धेश्वर महाशिवरात्री यात्रेस उद्यापासून प्रारंभ
By Admin | Updated: February 16, 2015 00:52 IST2015-02-16T00:44:03+5:302015-02-16T00:52:15+5:30
लातूर : लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवाची जय्यत तयारी पूर्ण झाली असून, या महोत्सवाला मंगळवार १७ फेब्रुवारीस प्रारंभ होत आहे़

श्री सिद्धेश्वर महाशिवरात्री यात्रेस उद्यापासून प्रारंभ
लातूर : लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवाची जय्यत तयारी पूर्ण झाली असून, या महोत्सवाला मंगळवार १७ फेब्रुवारीस प्रारंभ होत आहे़ या दिवशी शाही झेंडा मिरवणूक निघणार आहे़
परंपरेनुसार सोमवारी रात्री १२ वाजता गवळी समाजाच्या वतीने सिद्धेश्वरास दुधाचा अभिषेक होईल़ मंगळवारी सकाळी माळी समाजाच्या वतीने पुष्पवृष्ट होईल़ त्यानंतर सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी पांडरंग पोले यांच्या हस्ते मंदिरासमोरील प्रांगणात ध्वजारोहन होईल आणि दोन मार्च पर्यंत चालणाऱ्या यात्रा महोत्सवाला प्रारंभ होणार आहे़
मार्केट यार्डातील गौरीशंकर मंदिरापासून मंगळवारी दुपारी दोन वाजता शाही झेंडा मिरवणूकीस प्रारंभ होणार आहे़ या मिरवणूकीत झांज पथक, शिवराज्यभिषेक पथक, दिंडी नृत्य पथक, घोडे, उंठ, रथावरील सजीव देखावे, महिला व पुरुष भजनी मंडळ, ढोल-बँडबाजा पथक, धनगरी ढोल, अराधी पथक, लाठीसाठी प्राचीन युद्धकला पथक सहीागी होणार आहे़ या वर्षी पासून गोजमगुंडे परिवाराच्या वतीने नंदी ध्वज या मिरवणुकीत असणार आहे़ ही मिरवणूक मार्केट यार्ड, हनुमान चौक, गंजगोलाई, सुभाष चौक, खडक हनुमान, पटेल चौक, सुरतशाहावली दर्गा रोड मार्गे सिद्धेश्वरप मंदिरात जाईल़ त्या ठिकाणी या मिरवणूकीचा समारोप होणार आहे़
या झेंडा मिरवणुकीच्या पूर्वतयारीसाठी रविवारी देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला देवस्थानचे अध्यक्ष विक्रम गोजमगुंडे, उपाध्यक्ष बाळकृष्ण पतंगे, यात्रा संयोजक अशोक भोसले, देवस्थानचे सचिव ज्ञानोबा गोपे, रमेश बिसेन, कोषाध्यक्ष सुरेश गोजमगुंडे, सांस्कृतीक प्रमुख सुरेंद्र पाठक, बाजार समिती प्रमुख ज्ञानोबा कलमे यांची उपस्थिती होती.
दरम्यान, ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर १००१ महिला रूद्राभिषेक करणार आहेत़ याची सुरुवात सकाळी १० वाजता मंदिरात होणार आहे़ महिला मेळावा व रूद्राभिषेक यात महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. शुभदा रेड्डी, सुखदा मांडे, डॉ़ दीपा गिते, बालिका पडिले, पार्वती सोमवंशी, शाहीन शेख, करूणा शिंदे, सरोजनी पाटकर, महादेवी गारठे, सुरेखा कोरे, सविता गंगापूरे, भारती अंकलकोटे आदी महिला परिश्रम घेत आहेत. (प्रतिनिधी)