श्री मुक्तेश्वर मंदिरात २४ तास रुद्राभिषेक

By Admin | Updated: November 28, 2014 01:11 IST2014-11-28T00:06:22+5:302014-11-28T01:11:37+5:30

औसा : शहराचे ग्रामदैवत श्री मुक्तेश्वर मंदिराचा कलशारोहण समारंभ रविवारी तीन पीठांच्या जगद्गुरुंच्या हस्ते होणार आहे. त्यानिमित्त २४ तास मुक्तेश्वरास रुद्राभिषेक सुरू करण्यात

Sri Mukteshwar 24-hour Rudrabhishek at the temple | श्री मुक्तेश्वर मंदिरात २४ तास रुद्राभिषेक

श्री मुक्तेश्वर मंदिरात २४ तास रुद्राभिषेक



औसा : शहराचे ग्रामदैवत श्री मुक्तेश्वर मंदिराचा कलशारोहण समारंभ रविवारी तीन पीठांच्या जगद्गुरुंच्या हस्ते होणार आहे. त्यानिमित्त २४ तास मुक्तेश्वरास रुद्राभिषेक सुरू करण्यात आल्याची माहिती मुक्तेश्वर देवालय कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. मुक्तेश्वर वागदरे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.
औसेकरांचे श्रद्धास्थान आणि ग्रामदैवत असलेल्या श्री मुक्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, आमदार बसवराज पाटील, माजी आमदार पाशा पटेल व अन्य भाविकांच्या निधीतून करण्यात आले आहे. ४५ फूट रुंद व ११० फूट लांबीच्या सभागृह मंदिराचा जीर्णोद्धार व कलशाचे बांधकाम करण्यात आले आहे. या कलशारोहण कार्यक्रमानिमित्त२४ तास महारुद्राभिषेक होत आहे़ शुक्रवारी नंदीची स्थापना, शनिवारी ‘श्रीं’च्या मूर्तीसह कलशाची शहरातून मिरवणूक काढण्यात येईल़ त्यानंतर दुपारी जगद्गुरुंचे आशिर्वचन होईल़ रात्री ह.भ.प. गुरुबाबा महाराज यांचे चक्रीभजन होईल़ रविवारी कलशारोहण कार्यक्रम आणि महाप्रसाद होणार आहे.
कार्यक्रमास औसा, लातूर, उस्मानाबाद, सोलापूरसह अन्य ठिकाणचे भाविक उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त स्मरणिकेचे प्रकाशनही होणार असून, भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही अ‍ॅड. मुक्तेश्वर वागदरे यांनी केले आहे.
यावेळी अ‍ॅड. भीमाशंकर कारंजे, विजयकुमार मिटकरी, महिशंकर उटगे, अ‍ॅड. विजयकुमार कारंजे, धनंजय कोपरे, दादा कोपरे यांच्यासह देवालय कमिटीचे सदस्य व मुक्तेश्वर मंदिराचे पुजारी वीरभद्र स्वामी यांची उपस्थिती होती. (वार्ताहर)४
या कार्यक्रमास काशी पीठाचे जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, श्रीशैल पीठाचे श्री श्री श्री १००८ जगद्गुरु डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी, उज्जैन पीठाचे श्री श्री श्री १००८ जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या उपस्थितीत हा कलशारोहण कार्यक्रम होणार आहे. श्री ष.ब्र. १०८ शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली १६ शिवाचार्य तसेच ह.भ.प. गुरुबाबा महाराज व गहिनीनाथ महाराज हेही उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Sri Mukteshwar 24-hour Rudrabhishek at the temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.