एसपीओंनी प्रसंगावधान राखून वाचवले ८ मुलांचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:53 IST2017-09-26T00:53:28+5:302017-09-26T00:53:28+5:30
ग्रामनगर रेल्वे ओव्हरब्रिज परिसरातील नवरात्र रास दांडिया आटोपून शहरात परतत असताना रेल्वेपटरीवर आलेल्या आठ मुलांचे प्राण वाचविण्यात विशेष पोलीस अधिकाºयांना (एसपीओ) सोमवारी रात्री यश आले.

एसपीओंनी प्रसंगावधान राखून वाचवले ८ मुलांचे प्राण
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : संग्रामनगर रेल्वे ओव्हरब्रिज परिसरातील नवरात्र रास दांडिया आटोपून शहरात परतत असताना रेल्वेपटरीवर आलेल्या आठ मुलांचे प्राण वाचविण्यात विशेष पोलीस अधिका-यांना (एसपीओ) सोमवारी रात्री यश आले.
याविषयी अधिक माहिती देताना सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात म्हणाले की, शहरात सध्या सर्वत्र रास दांडियाची धूम सुरू आहे. संग्रामनगर रेल्वेपटरी परिसरात सुरू असलेल्या रास दांडिया पाहून सात ते आठ मुले पायीच रेल्वेपटरी ओलांडू लागले. यावेळी नंदीग्राम एक्स्प्रेस ही रेल्वेगाडी वेगात येत होती. १५ ते २० फुटांवर ही गाडी आल्याचे पाहून कर्तव्यावर असलेले विशेष पोलीस अधिकारी श्रीमंत गोर्डे पाटील, संतोष उदावंत, श्यामसुंदर थोरात, किरण जोशी, उमेश डोंगरे, राहुल सोनकांबळे, बाळू लोखंडे यांनी प्रसंगावधान राखून सिटी वाजवून सर्व मुलांना रेल्वेपटरीवरून ओढले आणि काही क्षणात त्यांच्या समोरून रुळावरून रेल्वे धावली. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या सेवेच्या संधीमुळे ८ मुलांचे प्राण वाचविता आल्याने धन्य झाल्याची भावना त्यांनी पोलीस निरीक्षक सतीश टाक यांच्याशी बोलताना व्यक्त केली.