क्रीडा संचालकांकडून नुसताच कागदी ‘खेळ’ !

By Admin | Updated: January 1, 2015 00:26 IST2015-01-01T00:04:52+5:302015-01-01T00:26:52+5:30

बीड : येथील जिल्हा क्रीडा अधिकारी निलीमा आडसूळ यांच्या विरूद्ध विविध २२ संस्थांनी कामात हलगर्जीपणा आणि कामचुकारपणा करीत असल्याची तक्रार केली होती

Sports 'paper' from sports directors! | क्रीडा संचालकांकडून नुसताच कागदी ‘खेळ’ !

क्रीडा संचालकांकडून नुसताच कागदी ‘खेळ’ !


बीड : येथील जिल्हा क्रीडा अधिकारी निलीमा आडसूळ यांच्या विरूद्ध विविध २२ संस्थांनी कामात हलगर्जीपणा आणि कामचुकारपणा करीत असल्याची तक्रार केली होती, याची दखल घेत उपसंचालकांनी चौकशी केली होती, यामध्ये आडसूळ या दोषी आढळल्या होत्या, मात्र तेव्हापासून अद्यापर्यंत कसलीच कारवाई झाली नसल्याने संशय व्यक्त केला जात आहे.
येथील जिल्हा क्रीडा कार्यालयाचा कारभार सध्या ढिसाळ सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. कार्यालयातील अस्वच्छता, क्रीडांगणाचे रखडलेले प्रस्ताव आणि खेळाडूंना मिळत नसलेल्या सुविधा यामुळे या कार्यालयाबद्दल संताप व्यक्त होत आहे. हाच धागा पकडून मागील काही वर्षापासून या कार्यालयाबद्दल उपसंचालकांकडे तक्रारी केल्या जात आहेत. मात्र या तक्रारीची दखल घेतली जात नव्हती. वारंवार तक्रारी येत असल्याने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांनी चौकशी करण्याचे आदेश उपसंचालकांना दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी याची चौकशी केली, विशेष म्हणजे, एक, दोन नव्हे तर चार वेळेस आडसूळ चौकशी केली होती. यामध्ये त्या दोषी आढळल्या होत्या. हाचा अहवाल पुन्हा क्रीडा संचालनालयाला प्राप्त झाला. आणि हेी फाईल मंत्रालयात गेली. मात्र यावर कसलीच कारवाई झाली नाही.
एकीकडे आडसुळ यांच्याविरोधातील तक्रारीचा अहवाल मंत्रालयात पडून होता तर दुसऱ्या बाजुला संस्था आक्रमक झाल्या होत्या. या संस्थांनी पुन्हा तक्रार केली. त्याप्रमाणे २५ आॅगस्ट २०१४ रोजी औरंगाबाद विभागाचे क्रीडा उपसंचालक सी.आर. कांबळे यांच्या नेतृत्वाखाली एक चौकशी समिती नेमून पाहणी केली होती. त्यानंतर याचा अहवाल क्रीडा संचालनालयाला ११ सप्टेंबर २०१४ रोजी प्राप्त झाला होता. यामध्येही त्या दोषी आढळल्या होत्या.
काय आढळले होते चौकशीत ?
कार्यालयाच्या दर्शनी भागात पायऱ्यांची तोडफोड, परीसरात गवत, स्वच्छता गृहात पाणी, ट्यूबलाईट यांचा अभाव, स्वच्छतागृहाची अस्वच्छता. भिंतीही दुर्गंधीयुक्त होत्या, पहिल्या मजल्यावरील स्वतंत्र स्वच्छतागृहही अस्वच्छ, तीसऱ्या मजल्याच्या जिन्यामध्ये जंपींग मॅट पडलेल्या होत्या, या येथे कशा काय विचारले असता, क्रीडधिकाऱ्यांनी आपण पहिल्यांदाच पाहत असल्याचे सांगितले. क्रीडा साहित्यसाची आपणास माहिती नाही, असे या अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.
योजनांचे प्रस्तावही रखडलेलेच होते, हे प्रस्ताव फरशीवर पाण्याने भिजलेल्या अवस्थेत होते, इमारतींच्या दुरूस्तीबाबतची कसलीच काळजी आपल्याला नाही. यावरील खर्चाचा तपशीलही नाही. संकुलाच्या खात्यामध्ये शिल्लक असलेल्या १.६४ कोटी निधीतून कोणत्या सुविधा निर्माण करावयाच्या याबाबत कसलाही आराखडा नाही, तालुका क्रीडा संकुलाचा निधीही अखर्चीत आहे, यासारखे अनेक मुद्दे यामध्ये नमुद करण्यात आलेले आहेत.
याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी निलीमा आडसूळ यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता. त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Sports 'paper' from sports directors!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.